Devendra Fadnavis On Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुती सरकार स्थापन झालेले आहे विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला 200 पेक्षा अधिक जागा मिळाल्या आहेत त्यामध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे त्यांना 132 जागा मिळाल्या आहेत तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला व उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांना पण मोठे यश प्राप्त झालेले आहे. महायुतीच्या विजयामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना ही गेम चेंजर ठरलेली आहे.
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना सरकारकडून दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जात आहे आणि आता महिलांना या योजनेअंतर्गत 2100 रुपये दिले जाणार आहे कारणाचे असे आश्वासन महायुती सरकारने निवडणुकी प्रचारादरम्यान महिलांना दिलेले होते त्याच मुद्द्यावर आज महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांनी प्रश्न विचारले असता या योजने संदर्भात अनेक मुद्द्यावर त्यांनी उत्तर दिले तर आज आपण या संदर्भात संपूर्ण माहिती पुढे पाहणार आहोत.
Table of Contents
आझाद मैदानावर शपथविधी सोहळा संपन्न
महाराष्ट्र राज्य मध्ये महायुती सरकारला मोठ्या प्रमाणात बहुमत मिळाले आहे आणि काल 5 डिसेंबर 2024 रोजी आझाद मैदानावर सायंकाळी 5:30 वाजता देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचे शपथ घेतली व तसेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन झाले.
Devendra Fadnavis On Ladki Bahin Yojana
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी सोहळा संपन्न झाल्यानंतर पत्रकारांना उत्तर देताना ते म्हणाले की लाडकी बहीण योजना ही कधीही बंद होणार नाही आणि ही योजना पुढे देखील ठेवण्यात येणार आहे आणि आता या योजनेच्या हप्त्यात वाढ करून 2100 रुपये दरमहा दिला जाईल पण त्यासाठी आम्ही बजेट वेळी तसा विचार करू राज्यातील सर्व आर्थिक स्त्रोत यांचा अभ्यास करून आणि विचार करूनच अशा प्रकारचे निर्णय घेतले जाऊ शकतात त्याच प्रकारे योग्य पद्धतीने निर्णय घेतले जातील आणि त्याचप्रमाणे 2100 रुपये महिना महिलांना देण्याचा निर्णय हा अंतिम आहे जे आश्वासने महायुतीकडून देण्यात आलेले आहेत ती नक्कीच आम्ही पूर्ण करू.
आम्ही दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी ज्या तरतुदी करण्याची गरज आहे ती आम्ही पूर्ण क्षमतेने करू आणि ज्या महिला या योजनेच्या निष्काच्या आत बसतील त्यांना या योजनेचा लाभ नक्कीच दिला जाईल आणि कोणती महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
या तारखेपर्यंत जमा होणार लाडक्या बहिणीचे पैसे
काल आझाद मैदानावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा संपन्न झालेला आहे आणि राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकार स्थापन झाले आहे राज्यामध्ये पुन्हा महायुती सरकार येण्यामागे लाडक्या बहिणीचा मोठा आशीर्वाद आहे असे अनेक तज्ञाकडून म्हटले जात आहे आणि आता त्या लाडक्या बहिणी या योजनेच्या सहाव्या हप्त्याची प्रतिक्षे मध्ये आहे
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना बोलताना म्हणाले की लाडकी बहीण योजनेच्या निष्काच्या आत बसतील अशा सर्व महिलांना या योजनेत अंतर्गत लाभ दिला जाईल त्याचप्रमाणे मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार 15 डिसेंबर 2024 पर्यंत या योजनेचा सहवा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
या निर्णयामुळे होणार लाखो महिला अपात्र
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .