Ladki Bahin Yojana Disqualified : अपात्र महिलांच्या खात्यात जमा झाले 1500 रुपये , पहा संपूर्ण माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ladki Bahin Yojana Disqualified News In Marathi : महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेला मागील झालेल्या 2024-25 अर्थसंकल्पात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी घोषणा केली या योजनेच्या माध्यमातून राज्यातील आर्थिक दृष्ट्या व कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांना पंधराशे रुपये दर महिन्याला देण्यास सुरुवात झाली. सरकारकडून जुलै ते डिसेंबर महिन्याचे तीन कोटीच्या जवळपास पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले.

परंतु सरकारकडून लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या अर्जाची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे त्यामध्ये लाखो महिला वगळल्या जातील अशी शक्यता वर्तवली जात होती अशातच मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार सरकारकडून लाखो अपात्र महिलांच्या खात्यात सहावा हप्ता जमा करण्यात आलेला आहे तर आज आपण या संदर्भात सविस्तर माहिती पुढे पाहूया.

फक्त 1500 जमा 2100 रुपये कधी मिळणार

महायुती सरकारकडून विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राज्यातील महिलांना आश्वासन दिले होते की राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकार आल्यास लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये महिना देण्यात येईल आणि महिलांच्या आशीर्वादाने राज्यांमध्ये महायुती सरकार पुन्हा स्थापन झाले.

परंतु महाराष्ट्र सरकारकडून 24 डिसेंबर 2024 रोजी लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता महिलांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात झाली त्यामध्ये महिलांना डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये जमा झाले पण सरकारने जे महिलांना आश्वासन दिले होते की लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2100 रुपये दिले जाणार तर ते कधीपासून मिळणार आहे असा प्रश्न महिलांकडून उपस्थित केला जात आहे

हे पण वाचा :  फ्री 3 गॅस सिलेंडर वाटप प्रक्रिया सुरू, लाडक्या बहिणींनो लगेच करा अर्ज सादर

या संदर्भात माहिती मिळाली असता महाराष्ट्र सरकारकडून पुढील वर्षाच्या अर्थसंकल्पात या योजनेच्या वाढीव हापत्याची तरतूद करण्यात येणार आहे त्यामुळे महिलांना मार्च महिन्याच्या नंतर 2100 रुपये महिना मिळण्याची शक्यता आहे.

अपात्र महिलांच्या खात्यात पण जमा झाला 6 वा हप्ता

राज्यातील विधानसभा निवडणूक झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेसंदर्भात जोरदार चर्चा सुरू होती की आता लाडकी बहीण योजनेच्या मंजूर अर्जाची पडताळणी होणार या योजनेच्या लाखो महिलांना अपात्र करण्यात येणार परंतु राज्याचे मुख्यमंत्री व अनेक महायुतीचे नेत्यांनी स्पष्ट सांगितले होते की सरकारने अद्याप आतापर्यंत लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पुन्हा पडताळणी करण्यासंदर्भात कोणताच निर्णय घेतलेला नाही.

Ladki Bahin Yojana Disqualified
Ladki Bahin Yojana Disqualified

त्यामुळे ज्या महिला या योजनेच्या पात्र आहेत त्या सर्व महिलांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार त्याचप्रमाणे निराधार योजनेच्या पात्र महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करून लाभ घेत आहे अशा महिलांना योजनेतून वगळली जाणार आहे अशी माहिती समोर येत होती परंतु सरकारकडून कोणत्याही महिलांना योजनेमधून सध्या तरी वगळलेली नाही सर्व पात्र महिलांच्या खात्यात डिसेंबर महिन्याचे पैसे सरकारने जमा केलेले आहेत.

Ladki Bahin Yojana Disqualified Important Link

Ladki Bahin Yojana Apply LinkClick Here
Ladki Bahin Online Aadhar LinkClick Here
Ladki Bahin Aadhar Link CheckClick Here
Ladki Bahin Yojana Balance CheckClick Here

1 thought on “Ladki Bahin Yojana Disqualified : अपात्र महिलांच्या खात्यात जमा झाले 1500 रुपये , पहा संपूर्ण माहिती”

Leave a Comment