Ladki Bahin Yojana Next Installment News In Marathi : राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेमध्ये असलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या व गरीब परिवारातील महिलांना राज्य सरकार दर महिन्याला 1500 रुपये देत आहे आतापर्यंत सरकारने 5 हप्त्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा केलेली आहे परंतु महिला व बाल विकास विभागाने या योजनेला सध्या ब्रेक दिलेला आहे.
आता या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांच्या खात्यात लाभ हस्तांतरित केला जाणार नाही त्यामुळे राज्यातील महिलांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत आहे कि या योजनेचे पुढील हफ्ते मिळणार का नाही यासंदर्भात माझी महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सविस्तर माहिती दिलेली आहे ते आपण पुढे पाहणार आहोत.
Table of Contents
लाखो महिला योजनेच्या लाभापासून वंचित
महाराष्ट्र सरकारने 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे मिळून 3000 हजार रुपये तर काही महिलांना उर्वरित सर्व हप्त्याचे पैसे 7500 हजार रुपये जमा करण्यात आलेले आहेत परंतु राज्यांमध्ये आचारसहिता लागू केल्यामुळे 10 लाख पात्र महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहत आहे अशा सर्व महिलांना आता प्रतीक्षा करावी लागणार आहे.
हे पण वाचा : उर्वरित लाखो महिलांना या दिवशी मिळणार ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे
लाडकी बहीण योजनेचे पुढील हप्ते मिळणार का नाही ?
सोशल मीडियावर सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद झाली आता पुढील हप्ता मिळणार का नाही अशी चर्चा होत आहे यासंदर्भात अदिती तटकरे यांनी 19 ऑक्टोबर 2024 रोजी ट्विटरवर वरून पोस्ट करत माहिती दिली की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हि कायम सुरूच राहणार असे त्यांनी स्पष्ट केले आणि त्याचप्रमाणे त्या महिलांना महाराष्ट्र सरकारने नोव्हेंबर पर्यंतचे हप्त्याचे पैसे खात्यात आधीच जमा केलेले आहेत आणि उर्वरित पात्र महिलांच्या खात्यात डिसेंबर महिन्यामध्ये पैसे जमा होतील.
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .