Ladki Bahin Yojana Status Check : महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी महाराष्ट्र सरकार महिलांना 1500 रुपये प्रति महिना देणार आहे या योजनेचा लाभ घेऊन राज्यातील महिला आपल्या कुटुंबाचा सांभाळ करू शकतील आणि त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागणार नाही व त्यांना आर्थिक स्वतंत्र मिळेल अशा उद्देशाने ही योजना महाराष्ट्र सरकार ने लागू केली आहे.
महाराष्ट्र सरकारने या योजनेचा पहिला हप्ता जुलै आणि ऑगस्ट महिन्याची मिळून तीन हजार रुपये नारीशक्ती दूत ॲपच्या माध्यमातून अर्ज केलेल्या लाखो महिलांच्या खात्यामध्ये जमा आहेत आणि उर्वरित पात्र महिलांना लवकर त्यांच्या बँक खात्यात या योजनेचा पैसा जमा होईल.
परंतु ज्या महिलांनी महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज सादर केलेला आहे अशा काही लाखो महिलांचे अर्ज सरकार काही कारणास्तव रिजेक्ट केलेला आहे , तर आज आपण सरकारकडून कोणत्या कारणामुळे लाडकी बहीण योजनेचे अर्ज रिजेक्ट केले जात आहे आणि Ladki Bahin Yojana Status Check कशाप्रकारे चेक करायचे या संदर्भात आपण पुढे पाहणार आहोत.
Table of Contents
Ladki Bahin Yojana Overview
योजनेचे नाव | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024 |
वर्ष | 2024 |
विभाग | महिला व बाल कल्याण विभाग महाराष्ट्र |
राज्य | महाराष्ट्र |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील कमी उत्पन्न असणाऱ्या महिला |
आर्थिक मदत | 1500 रुपये प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन/ऑफलाइन |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 30 सप्टेंबर 2024 |
Ladki bahin Yojana Official Website | https://ladakibahin.maharashtra.gov.in |
हेल्पलाइन नंबर | 181 |
Ladki Bahin Yojana 2024
महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील महिलांना ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे सरकारने या योजनेची अधिकृत वेबसाईट लॉन्च केली आहे ह्या वेबसाईटच्या माध्यमातून राज्यातील महिला ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात व त्याचप्रमाणे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे व महिलांचे वय 21 ते 65 वयोगटातील असावे .
Ladki Bahin Yojana Document
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- अधिवास प्रमाणपत्र ( जर महिला जवळ अधिवास प्रमाणपत्र नसेल तर जन्मदाखला, शाळा सोडल्यास दाखला, मतदान कार्ड, राशन कार्ड यापैकी कोणती एक पंधरा वर्षे पूर्ण झालेले कागदपत्र सादर करावे लागले )
- उत्पन्न प्रमाणपत्र किंवा राशन कार्ड ( राशन कार्ड हे पिवळ्या किंवा केसरी रंगाचे असणे आवश्यक )
- अर्जदार महिला चा फोटो
- हमीपत्र
Ladki Bahin Yojana Status Check
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जर तुम्ही पण अर्ज केलेला आहे आणि तुम्हाला अर्जाची स्थिती तपासायची आहे तर तुम्हाला खाली दिलेल्या स्टेप ला फॉलो करावे लागेल.
- सर्वात पहिले तुम्हाला योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर https://ladakibahin.maharashtra.gov.in जावे लागेल
- वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला अर्जदार लॉगिन या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे
- आता तुमच्यासमोर Login पेज होऊन होईल त्यामध्ये तुम्ही बनवलेली युजर आयडी पासवर्ड टाकून लॉगिन करून घ्यावे
- लॉगिन केल्यानंतर Applications Made Earlier या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे.
- आता तुमच्यासमोर तुम्ही केलेले अर्जाची लिस्ट दिसेल
- त्यामध्ये तुम्हाला Applcation Status मध्ये PENDING असे दाखवत असल्यास तुमचा अर्ज तालुकास्तरीय समितीमार्फत पडताळणी करणे बाकी आहे.
- जर तुम्हाला Applcation Status मध्ये RE-SUBMIT असे दाखवत असल्यास तुमचा अर्ज काही त्रुटी संदर्भात रिजेक्ट केलेला आहे.
- व त्याचप्रमाणे Applcation Status मध्ये APPROVEL असे दाखवत असल्यास तुमचा अर्ज तालुकास्तरीय समितीमार्फत मंजूर केलेला आहे.
तर अशा प्रकारे तुम्ही मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची स्थिती पाहू शकता.
वेबसाईटने केलेले लाखो अर्ज रिजेक्ट
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महाराष्ट्र शासनाने 1 ऑगस्ट 2024 रोजी अधिकृत वेबसाईट लॉन्च केली आहे या वेबसाईटच्या माध्यमातून लाखो महिलांनी ऑनलाइन अर्ज सादर केलेला आहे अशा महिलांचे अर्ज तालुका स्तरीय समितीमार्फत पडताळणी केली जात आहे त्यामध्ये काही महिलांचे अर्ज त्रुटी संदर्भात रिजेक्ट केले गेले आहेत .
त्यासाठी महिलांना आपल्या अर्जामध्ये जे काही त्रुटी आलेली आहे ते त्रुटी दूर करून तो अर्ज परत एकदा सादर करावा लागेल.
Ladki Bahin Yojana Important Link
Ladki Bahin Yojana Official Website Portal Apply Link | Click Here |
Ladki Bahin Online Aadhar Link | Click Here |
Ladki Bahin Aadhar Link Check | Click Here |
re-Apply Ladki Bahin Yojana Reject Form | Click Here |
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .
20 thoughts on “Ladki Bahin Yojana Status Check : वेबसाईटने केलेले लाखो अर्ज रिजेक्ट, लगेच चेक करा तुमच्या अर्जाची Status”