Mazi Ladki Bahin Update News In Marathi : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही योजना महाराष्ट्र राज्यातील चर्चेत असलेली योजना आहे या योजनेच्या मदतीनं मागील झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात बहुमत मिळवले आहेत या योजनेच्या अंतर्गत गरीब कुटुंबातील महिलांना महाराष्ट्र सरकार 1500 रुपये महिना देत आहेत आणि लवकरच या योजनेअंतर्गत 2100 रुपये महिना दिला जाणार आहे.
आतापर्यंत सरकारने या योजनेअंतर्गत सहा महिन्याचे पैसे 9000 रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा केलेले आहेत त्याचप्रमाणे या योजनेचा सातवा हप्ता पण महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे परंतु अनेक महिलांच्या खात्यात अजून पैसे जमा झाले नाहीत अशा मुळे महिलांना प्रश्न पडला आहे की हे सरकारने आम्हाला अपात्र घोषित केले तर नाही ? तर आज आपण या ( Mazi Ladki Bahin Update ) संदर्भात सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत.
7 वा हप्ता या कालावधीत होणार जमा
महाराष्ट्र सरकारने डिसेंबर महिन्याचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात 24 डिसेंबर ते 30 डिसेंबर कालावधीमध्ये जमा केलेला होता आता महिला या योजनेच्या सातव्या हाताची आतुरतेने वाट पाहत आहे अशातच महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे सरकारने या योजनेचा सातवा हप्ता महिलांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात केलेली आहे त्यामध्ये सरकारने सातवा हप्ता जमा करण्याचे काही टप्पे दिलेले आहेत त्या टप्प्यानुसार महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत.
मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारकडून 22 जानेवारी 2025 ते 26 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये पहिल्या टप्प्या अंतर्गत महिलांच्या खात्यात खात्यात सातवा हप्ता जमा केला जाणार आहे व त्यानंतर 26 जानेवारी ते 30 जानेवारी या कालावधीमध्ये दुसऱ्या टप्प्यात महिलांच्या खात्यात या योजनेचा सातवा हप्ता जमा केला जाणार आहे त्याचप्रमाणे अनेक महिलांच्या खात्यात या योजनेचा सातवा हप्ता जमा पण झालेला आहे.
पैसे जमा झाला नाही, लगेच चेक करा अपात्र यादीत नांव
महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी काही निकष ठेवले होते परंतु राज्यातील अनेक महिलांनी या योजनेच्या निकषाचे पालन न करता या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करून त्या महिला या योजनेचा लाभ घेत आहे अशा महिलांनी स्वतःहून या योजनेतून बाहेर पडावे अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे आवाहन सरकारकडून केलेजात आहे.
त्याचप्रमाणे सरकारने महिला बाल विकास विभागाला निर्देश दिले होते की लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची फेर पडताळणी करण्यात यावी त्या निर्देशाचे पालन करून महिला व बाल विकास विभागाने लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पडताळणी केली आहे त्यामध्ये 60 लाख महिला अपात्र घोषित करण्यात आलेले आहेत त्यामुळे महिलांना प्रश्न पडला आहे की सरकारने आम्हाला अपात्र घोषित केले तर नाही ?
हे पण वाचा : 24 तासात जमा होणार या महिलांच्या खात्यात 7 हप्ता

यासंदर्भात ( Mazi Ladki Bahin Update ) माहिती मिळाली असता सरकारने स्पष्ट सांगितले आहे की ज्या महिला या योजनेच्या निकषात बसत नाही परंतु त्या महिला या योजनेचा लाभ घेत आहे अशा महिलांना या योजनेतून वगळण्यात येईल परंतु ज्या महिला या योजनेच्या निकषांमध्ये बसत आहे अशा महिलांना चिंता करायची आवश्यकता नाही त्या महिलांना पुढील काही दिवसांमध्ये या योजनेचा लाभ जमा होईल.

नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .
2 thoughts on “Mazi Ladki Bahin Update : 7 वा हप्ता जमा झाला नाही, लगेच चेक करा अपात्र यादीत नांव”