Yojana Doot Online Apply 2024 : महाराष्ट्र सरकारने राज्यातील युवकांसाठी एक संधी उपलब्ध केलेली आहे सरकारच्या विविध योजनांची माहिती व प्रसार प्रसिद्धी करण्यासाठी व नागरिकांना जास्तीत जास्त योजना चा लाभ मिळावा यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम ( Mukhyamantri Yojana Doot ) सुरू केलेला आहे या कार्यक्रमांतर्गत सरकार 50 हजार योजनादूत पदे भरती करणार आहे आणि यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पण सुरू करण्यात आलेली आहे तर आज Yojana Doot Online Apply प्रक्रिया संदर्भात व इतर संपूर्ण माहिती आपण पुढे सविस्तर पाहणार आहोत.
Table of Contents
Yojana Doot Online Apply Overview
भरती चे नाव | मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम भरती |
पद | योजनादूत |
उद्देश | गाव पातळीवर सरकारी योजना ची माहिती व जनजागृती करणे |
राज्य | महाराष्ट्र |
वेतन | 1000 हजार रुपये प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन |
Yojana Doot Official Website | https://mahayojanadoot.org |
मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम.
महाराष्ट्र सरकारने ग्रामपंचायत स्तरावर विविध योजनेची प्रचार प्रसिद्धी करणे व त्याप्रमाणे नागरिकांना शासकीय योजनेचा लाभ मिळावा या उद्देशाने मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे सरकारने ग्रामपंचायत स्तरावर 50 हजार योजनादूत पद भरती करणार आहे यासंदर्भात शासन निर्णय पण काढण्यात आलेले आहे .
मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमाचे उद्दिष्ट
महाराष्ट्र सरकार वेळोवेळी अनेक योजना राबवत असते परंतु राज्यातील नागरिकांना योजने संदर्भात माहिती मिळत नाही आणि असे नागरिक या योजनेपासून वंचित राहतात या सर्व बाबी वर लक्ष देत महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम राबविण्यात सुरुवात केली आहे या योजनादूत च्या मदतीने नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती मिळावी आणि कोणीही शासनाच्या योजना पासून वंचित राहू नये या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने योजनादूत पद भरती करत आहे.
मुख्यमंत्री योजनादूत साठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- पदवी उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र
- अधिवास प्रमाणपत्र
- बँक पासबुक
- पासपोर्ट साईज फोटो
- हमीपत्र
- आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक
मुख्यमंत्री योजनादूत ची पात्रता
- अर्जदाराचे वय 18 ते 35 वयोगटातील असावे
- शैक्षणिक अहर्ता कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक
- संगणक ज्ञान असणे आवश्यक
- उमेदवाराकडे मोबाईल फोन असणे आवश्यक
- उमेदवार महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक
- उमेदवाराकडे बँक पासबुक व तसेच आधार कार्ड असणे अनिवार्य
मुख्यमंत्री योजनादूतचे कार्य
- योजनादूत संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्कात राहून जिल्ह्यातील योजनांची माहिती घेणे
- योजना दूत यांना नेमून दिलेल्या ठिकाणी समक्ष जाऊन ठरवून दिलेले कामे पार पाडणे बंधनकारक राहील
- योजनादूत राज्य शासनाचे विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करताना ग्रामपंचायत पातळीवरील योजना ची माहिती घरोघरी पोहोचण्यात प्रयत्न करते.
- योजनादूत दर दिवशी त्यांनी केलेल्या कामाची विविध नमुन्यातील अहवाल तयार करून तो ऑनलाईन अपलोड करतील
- योजनादूत यांच्या जबाबदाऱ्या स्वतःच्या स्वार्थासाठी उपयोग करणार नाही व तसे करत असल्यास त्यांच्यासोबत करण्यात आलेला करार संपुष्टात आणण्यात येऊन त्यांना योजनादूत पदापासून मुक्त करण्यात येईल
- योजनादूत अधिकृतरित्या गैरहजर राहत असल्यास किंवा जबाबदारी सोडून गेल्यास त्यांना मानधन देण्यात येणार नाही.
Yojana Doot Online Apply Process
मुख्यमंत्री योजना दूत करिता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या स्टेपला फॉलो करावा लागेल.
- सर्वात पहिले तुम्हाला शासनाच्या मुख्यमंत्री योजना दूत या अधिकृत वेबसाईटवर ( https://mahayojanadoot.org ) जावे लागेल.
- शासनाच्या वेबसाईटवर तुम्हाला नोंदणी ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करून घ्या
- आता तुमच्यासमोर उमेदवार नोंदणी फॉर्म ओपन होईल
- तुम्हाला तुमचा Aadhar No मागितला जाईल Aadhar No टाकून Verify या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे.
- आता तुमच्या समोर Aadhar Verification पेज ओपन होईल त्यामध्ये आधार नं टाकून Get OTP यावर क्लिक करावे.
- तुमच्या आधार लिंक मोबाइल नंबर वर एक ओटीपी टाकून व्हेरिफाय करून घ्यावे
- आता तुमच्यासमोर काही प्रमाणात भरलेला नोंदणी फॉर्म ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला मागितलेली संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे भरून घ्यावी.
- तुमच्या मेल आयडीवर एक ओटीपी येणार तो ओटीपी टाकून वेरिफाय करून घ्या
- आता तुमच्यासमोर संपूर्ण अर्ज ओपन होईल त्यामध्ये उर्वरित सर्व माहिती व कागदपत्रे अपलोड करून घ्यावी.
- तुमची प्रोफाईल पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला Matching Jobs या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे
- आता तुम्हाला ज्या लोकेशन मध्ये काम करायचा आहे तो सिलेक्ट करायचे आहे जसे ज्या जिल्ह्यात तुम्हाला काम करायचे आहे त्या जिल्ह्याचे नाव , तालुका व ग्रामपंचायत
- आता तुमच्यासमोर तुमच्या ग्रामपंचायत व तालुक्यात स्तरावर किती Vacancy आहे ते दिसेल
- आता तुम्हाला ज्या ग्रामपंचायत मध्ये काम करत आहे ती ग्रामपंचायत सिलेक्ट करून तिथे तुम्हाला Apply करायचा आहे.
अशाप्रकारे तुम्ही योजनादूत साठी ऑनलाईन अर्ज करू शकता
Yojana Doot Bhart GR PDF
File Name | Yojana Doot Bhart GR PDF Download |
Size | 150kb |
Download Link | Click here |
FAQ- Yojana Doot Bharti 2024
योजनादूत साठी अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा काय आहे ?
अर्जदाराचे वय 18 ते 35 वयोगटातील असावे
योजनादूत साठी महिला अर्ज करू शकतात का ?
होय
योजनादूत साठी अर्ज कुठे करावा ?
महाराष्ट्र सरकारने योजनादूत पदाकरिता अर्ज करण्यासाठी ऑनलाइन प्रक्रिया सुरू केलेल्या आहेत तुम्ही शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर ( https://mahayojanadoot.org ) जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता .
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .
1 thought on “Yojana Doot Online Apply : 50 हजार योजनादूत पद भरती अर्ज प्रक्रिया सुरू, Eligibility, Docuement, Official Website, Yojana Doot Bharti GR”