Majhi Ladki Bahin 3rd Installment Date : मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली आहे या योजनेच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या गरीब परिवारातील महिलांना राज्य सरकार 1500 रुपये दर महिन्याला देणार आहे या योजनेचा लाभ घेऊन राज्यातील महिला आपल्या कुटुंबाचा सांभाळ करू शकतील आणि त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागू नये या उद्देशाने सरकारने ही योजना सुरू केली आहे
या योजनेअंतर्गत सरकारने आतापर्यंत दोन टप्प्यांमध्ये लाखो महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याची म्हणून 3000 हजार रुपये जमा केलेले आहेत.याच दरम्यान राज्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून योजनेच्या ₹1500 रुपये हप्त्या ऐवजी ₹3000 हप्ता करू या संदर्भातदेण्यासंदर्भात मोठी घोषणा करण्यात आलेली आहे त्याच प्रमाणे या योजनेचा ( Ladki Bahin 3rd Installment Date) तिसरा टप्पा कोणत्या तारखेला जमा होणार आहे या सर्व बाबी संदर्भात संपूर्ण माहिती आपण पुढे पाहूया.
Ladki Bahin 3rd Installment Date Overview
योजनेचे नाव | मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना |
योजनेची सुरुवात | 28 जून2024 |
राज्य | महाराष्ट्र |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब परिवारातील महिला |
आर्थिक मदत | ₹1500 रुपये |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
Ladki Bahin Yojana Official Website | Click Here |
हेल्पलाइन नंबर | 181 |
लाडकी बहीण योजनेच्या अर्ज प्रक्रियेत मोठा बदल
महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अर्ज प्रक्रियेमध्ये मोठा बदल केलेला आहे सरकारने सुरुवातीला या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे अनेक पर्याय उपलब्ध करण्यात आले होते महिला स्वतः किंवा सेतू केंद्रामध्ये जाऊन या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करत होत्या.
परंतु मागील झालेल्या सातारा जिल्ह्यातील या योजनेसोबत झालेला गैरवापर पाहता त्याचप्रमाणे उर्वरित महिलांची आकडेवारी कमी असल्याकारणाने या योजनेसाठी अर्ज करण्याची परवानगी फक्त अंगणवाडी केंद्रांना देण्यात आलेले आहे आता अंगणवाडी कर्मचारी ह्या योजनेचा अर्ज करणे आणि तो अर्ज मंजूर करणे हा अधिकार सरकारने त्यांना दिलेला आहे या संदर्भात सरकारने शासन निर्णय पण काढलेला आहे .
लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज आता कुठे करावा
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी जर तुम्ही काहि कारणास्तव आतापर्यंत या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर केलेला नाही अशा सर्व महिलांनी आपल्या जवळच्या अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन ऑफलाइन पद्धतीने फॉर्म जमा करायचा आहे त्यानंतर अंगणवाडी कर्मचारी तुमचा फॉर्म ऑनलाईन करतील आणि त्याच अंगणवाडी कर्मचारी तुमचा अर्ज पण मंजूर करतील आणि तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल..
तिसरा हप्ता ₹4500 रुपये या तारखेला जमा होणार
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत सरकारने दोन टप्प्यांमध्ये या योजनेचा पैसा लाखो महिलांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे परंतु अशा अनेक महिला आहेत ज्यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत परंतु त्यांना पैसा मिळालेला नाही अशा सर्व महिलांना Ladki Bahin 3rd Installment Date 28, 29, 30 सप्टेंबर या कालावधीमध्ये त्यांच्या खात्यात या योजनेचा पैसा जमा होणार आहे.
₹1500 ऐवजी ₹3000 हप्त्यामध्ये वाढ
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना संदर्भात एक मोठी घोषणा करण्यात आलेली आहे एका कार्यक्रमांमध्ये ते बोलत असताना मुख्यमंत्री म्हणाले लाडकी बहिणीचा आशीर्वाद आमच्या सरकारसोबत राहिल्यास येणाऱ्या काळामध्ये या योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ करून तीन हजार रुपये करू असे ते म्हणाले.
त्याचप्रमाणे काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीव्ही 9 मराठीच्या मुलाखतीमध्ये बोलताना ते म्हणाले की काँग्रेसचे सरकार आल्यास आम्ही या योजनेला तोडीस तोंड देणारी योजना ज्याचं नाव महालक्ष्मी योजना आणून आणि या योजनेच्या माध्यमातून महिलांना तीन हजार रुपये देऊ असे ते म्हणाले व त्याचप्रमाणे या योजनेच्या हप्त्याच्या दरवर्षी एक हजार रुपये वाढ करू असे असेही ते म्हणाले.
Ladki Bahin 3rd Installment Date Important Link
Ladki Bahin Online Aadhar Link | Click Here |
Ladki Bahin Online Aadhar Link Check | Click Here |
Ladki Bahini Yojana Online Apply | Click Here |
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .
1 thought on “Ladki Bahin 3rd Installment Date :आनंदाची बातमी तिसरा हप्ता ₹4500 रुपये या तारखेला जमा होणार, ₹1500 ऐवजी ₹3000 हप्त्यामध्ये वाढ”