Ladki Bahin Yojana ReApply : महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार महिलांना पंधराशे रुपये देत आहे या योजनेची अर्ज प्रक्रिया 1 जुलै 2024 ते 30 सप्टेंबर 2024 ठेवण्यात आलेली आहे आतापर्यंत या योजनेसाठी राज्यभरातून दोन कोटी पेक्षा अधिक महिलांनी ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत त्यापैकी अनेक महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे.
परंतु अशा अनेक महिला आहेत ज्यांचे अर्ज तांत्रिक किंवा वैयक्तिक चुकामुळे कायमस्वरूपी रिजेक्ट झालेले आहे अशा सर्व महिलांना प्रश्न पडला आहे की आम्हाला या योजनेचे लाभ कसा मिळणार ? यासंदर्भात सरकारने खूप मोठी घोषणा केलेली आहे अशा सर्व महिलांना काही पर्याय उपलब्ध आहेत तर आज आपण कायमस्वरूपी रिजेक्ट झालेले अर्ज कशाप्रकारे ( Ladki Bahin Yojana ReApply ) करता येईल आणि या योजनेचा लाभ कसा मिळेल या संदर्भात संपूर्ण माहिती आपण पुढे पाहणार आहोत.
Table of Contents
Ladki Bahin Yojana ReApply Overview
योजनेचे नाव | मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना |
अमलबजावणी | 28 जून 2024 |
राज्य | महाराष्ट्र |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील रहिवासी महिला |
आर्थिक मदत | 1500 रुपये प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन/ऑफलाइन |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 30 सप्टेंबर 2024 |
अधिकृत वेबसाईट | https://ladakibahin.maharashtra.gov.in/ |
हेल्पलाइन नंबर | 181 |
About Ladki Bahin Yojana
महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या व गरीब परिवारातील महिलांना सरकार 1500 रुपये देत आहे या योजनेचा लाभ घेऊन महिला आपल्या परिवाराचा सांभाळ करू शकतील आणि त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागणार नाही व त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळेल या उद्देशाने सरकारने ही योजना सुरू केलेली आहे आणि या योजनेला पूर्ण महाराष्ट्रभरातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
Ladki Bahin Yojana Eligibility Criteria
- अर्जदार महिलाही महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे
- अर्जदार महिलेचे वय किमान 21 ते 65 वयोगटातील असावे
- अर्जदार महिलेकडे व्यक्तिगत बँक पासबुक असणे आवश्यक
- अर्जदार महिलांच्या कुटुंबातील वार्षिक 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे
Ladki Bahin Yojana Documents Required
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- अधिवास प्रमाणपत्र किंवा 15 वर्षे पूर्ण झालेले मतदान कार्ड, शाळा सोडण्याचा दाखला, जन्म दाखला यापैकी एक
- उत्पन्नाचा दाखला ( जर उत्पन्नाचा दाखला नसेल तर पिवळ्या किंवा केशरी रंगाचे राशन कार्ड )
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- हमीपत्र
- एप्लीकेशन फॉर्म
अर्ज रद्द झालेल्या महिलांना मिळणार पुन्हा संधी
महाराष्ट्र सरकारने राज्यातील कोणतीही महिला या योजनेपासून वंचित राहू नये व सर्व गरीब महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकारने अर्ज करण्याची मुदत वाढ 30 सप्टेंबर 2024 केलेली आहे त्याचप्रमाणे अशा अनेक महिला आहेत ज्यांचे अर्ज काहि तांत्रिक चुकामुळे कायमस्वरूपी रिजेक्ट झालेले आहेत अशा सर्व महिलांना सरकार सप्टेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत पुन्हा एकदा नवीन संधी देणार आहे या संदर्भात राज्याचे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून माहिती देण्यात आली.
Ladki Bahin Yojana ReApply
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी जर तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर केलेला आहे आणि तुमचा अर्ज काही कारणास्तव कायमस्वरूपी रद्द झालेला आहे तर तुम्हाला सरकारकडून पुन्हा एकदा Ladki Bahin Yojana ReApply करण्याची संधी देण्यात येणार असून त्याची प्रक्रिया खालील प्रमाणे आहे.
- सर्वात पहिले तुम्हाला सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर ( https://ladakibahin.maharashtra.gov.in/) जावे लागेल त्यामुळे तुमचे लॉगिन आयडी पासवर्ड टाकून इंटर करून घ्यायचा आहे.
- लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला Applications Made Earlier या ऑप्शन वर क्लिक करायचं आहे त्यामध्ये तुम्ही केलेल्या अर्ज दिसतील.
- जो अर्ज कायमस्वरूपी रद्द करण्यात आलेला त्या अर्जाच्या स्टेटस मध्ये RE-APPLY ऑप्शन दिसेल त्या साईटला एडिट पण ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करून घ्यायचा आहे.
- एडिट ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून कॅपच्या फील करून घ्यायचा आहे आणि Validate Aadhar या ऑप्शन वर क्लिक करायचं आहे.
- तुमचा अर्ज पुन्हा एकदा ओपन होईल त्यामध्ये जी काही तुमची त्रुटी असेल ते व्यवस्थितपणे पूर्ण करून तो अर्ज परत एकदा सादर करून घ्यावा.
अशाप्रकारे तुम्ही कायमस्वरूपी रिजेक्ट झालेला अर्ज सादर करू शकता याबाबत लवकरच तुमच्या लॉगिन मध्ये RE-APPLY ऑप्शन सरकारकडून देण्यात येईल.
Ladki Bahin Yojana Important Link
Ladki Bahin Yojana 3rd Installment Date | Click here |
Ladki Bahin Online Aadhar Link | Click Here |
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .
1 thought on “Ladki Bahin Yojana ReApply : कायमस्वरूपी रिजेक्ट झालेला अर्ज असा करा सादर, पहा सविस्तर माहिती”