Winter Session Ladki Bahin Yojana News In Marathi : महाराष्ट्र राज्यामध्ये महायुती सरकारला मोठ्या संख्येने बहुमत मिळाले आणि राज्यांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार स्थापन झाले यामागे राज्यातील महिलांचा मोठा वाटा आहे असल्याचे स्पष्ट दिसून आले विधानसभा निवडणुकीच्या समोर 28 जून 2024 रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याद्वारे लाडकी बहीण योजनाचे घोषणा करण्यात आली आणि या योजनेच्या माध्यमातून गरीब महिलांना 1500 महिना देण्यास सुरुवात झाली.
सरकारने लाडकी बहीण योजना योग्य प्रकारे अंमलबजावणी करून 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत पाच हप्त्याचे पैसे 7500 हजार रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा केले परंतु अनेक महिलांची अर्ज मंजूर असून सुद्धा त्यांना या योजनेचा अद्याप लाभ मिळाला नाही व त्याचप्रमाणे अनेक महिला या योजनेच्या सहाव्या हप्त्याची वाट पाहत आहे अशातच महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे कारण राज्यात आज मंत्रिमंडळ स्थापन झालेला आहे तर आज आपण या संदर्भात सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत .
Table of Contents
लाडकी बहीण संदर्भात मोठी आनंदाची बातमी
महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अनेक प्रचार सभेमध्ये महिलांना आश्वासन दिले होते की राज्यात पुन्हा एकदा आमचे सरकार आल्यास या योजनेअंतर्गत महिलांना 1500 रुपये ऐवजी 2100 महिना देऊ अशाच राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुती सरकार स्थापन झाले परंतु महायुती सरकार स्थापन होऊन सुद्धा महिलांना या योजनेअंतर्गत 2100 रुपये चा हप्ता अद्याप आतापर्यंत मिळालं नाही.
यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार राज्यांमध्ये मंत्रिमंडळ स्थापित होणे बाकी होते त्यामुळे योजनेअंतर्गत वाढीव हप्ता संदर्भात कुठलाच निर्णय घेण्यात आलेला नव्हता परंतु राज्यात आज नवीन मंत्रिमंडळ स्थापन झालेले आहे आणि लवकरच हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे त्यामध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे त्यासाठी महिलांना पुन्हा काही दिवस या वाढीव हप्त्याची वाट पाहावी लागेल.
महिलांच्या खात्यात जमा होणार 9600 रुपये
राज्यातील अनेक महिला अशा आहेत की ज्यांनी या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केले व त्यांचे अर्ज जुलै महिन्यातच मंजूर झाले परंतु त्यांना या योजनेअंतर्गत एकही हप्ता मिळाले नाही त्याचप्रमाणे काही महिलांचे अर्ज मंजूर होणे बाकी होते तर अशा सर्व महिलांना या योजनेअंतर्गत किती पैसे मिळणार
यासंदर्भात आमच्या टीमने माहिती काढले असता ज्या महिलांना या योजनेअंतर्गत अर्ज मंजूर असून सुद्धा एकही हप्ता मिळाली नाही अशा महिलांना उर्वरित सर्व हप्त्याचे पैसे सरकारकडून दिले जाणार आहेत त्याचप्रमाणे ज्या महिलांनी ऑक्टोबर महिन्यामध्ये अर्ज सादर केले होते अशा महिलांच्या खात्यात उर्वरित सर्व हप्त्याचे पैसे व वाढीव रकमेचे पैसे पण त्यांना दिले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
हे भी पढे : जिल्ह्यात 75 हजार लाडक्या बहिणी अपात्र, लगेच पहा कशामुळे झाल्या या महिला अपात्र
2100 रुपये महिलांच्या खात्यात कधी जमा होणार
महायुती सरकारकडून राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना 2100 रुपये महिना दिला जाणार आहे परंतु हे पैसे कधी पर्यंत महिलांच्या खात्यात जमा होणार असा प्रश्न निर्माण केला जात आहे राज्यांमध्ये आज मंत्रिमंडळ पण स्थापन झालेले आहे आणि मोठ्या प्रमाणात महायुती सरकारला बहुमत पण मिळाले आहे तर या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार राज्यात उद्यापासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे अशातच पुढील दोन ते तीन दिवसाच्या आत महिलांच्या खात्यात या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभ जमा केला जाऊ शकतो.
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .