Torres Scam Mumbai News In Marathi : मुंबईतील दादर परिसरामध्ये टोरेस कंपनीने मोठा आर्थिक घोटाळा केला आहे आर्टिफिशियल डायमंड विक्रीच्या नावाखाली अमिश दाखवून कोटी रुपये गोळा केले आणि त्यानंतर पैसे गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आली या संबंधित पोलिसांनी पाच आरोपीवर गुन्हा दाखल केलेला आहे तर आज आपण या संदर्भात सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत.
Torres Scam Mumbai
मुंबई येथील दादर परिसरात एक मोठा आर्थिक घोटाळा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे मुंबई येथील दादर परिसरामधील टोरेस कंपनीने हजारो मुंबईकरांची फसवणूक केलेली आहे आर्टिफिशियल डायमंड विकणाऱ्या टोरेस कंपनीने ग्राहकांना आठवड्याला सहा टक्के पासून ते दहा टक्यापर्यंत परतवा देण्याची आमिष दाखवून कोटी वधी रुपये गोळा केलेले आहेत.
सुरुवातीला गुंतवणूकदारांना कंपनीकडून काही प्रमाणात परतावा देण्यात आला. मात्र गेल्या आठवड्यापासून कंपनीकडून काहीच परतावा न मिळाले नाही हा घोटाळा उघडीच आलेला आहे या संबंधित पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे
हे पण वाचा : लाडकी बहिणी योजनेची वेबसाईट ह्या दिवशी सुरू होणार
13 कोटी 81 लाख रुपयाची फसवणूक
यासंदर्भात तक्रार दादरच्या शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आलेली असून पाच जनावर पुन्हा दाखल पण झालेला आहे मीडिया रिपोर्ट च्या माहितीनुसार सर्वेश सुर्वे, व्हिक्टोरिया कोवालेन्का, तोफिक रियाज उर्फ जॉन कॉटर, व्हॅलेंटिना कुमार या पाच व्यक्तीवर आतापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दादर मधील टोरेस कंपनी 13 कोटी 68 लाख 15 हजार 92 रुपयाची फसवणूक केल्याची तक्रार पोलिसाकडे नमूद करण्यात आलेली आहे.
आता या प्रकरणांमध्ये पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे मात्र या घटनेनंतर अनेक गुंतवणूक दारावर पश्चातापाची वेळ आलेली आहे आम्हाला व्याज देऊ नका पण आम्ही गुंतलेले पैसे तेवढे परत द्या अशी मागणी गुंतवणूकदारांकडून केली जात आहे या कंपनीकडून काही दिवसापासून गुंतवणूकदारला कोणतीही माहिती दिली जात नव्हती त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊन ही फसवणूक समोर आली.
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .