Ladki Bahin Yojana 8th Kist News Marathi : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही योजना महाराष्ट्र राज्यातील सर्वात लोकप्रिय आणि चर्चेत असलेली योजना आहे या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील महिलांना महाराष्ट्र सरकार दर महिन्याला 1500 रुपये महिना देत आहे या योजनेचा लाभ घेऊन महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम होतील व त्यांना परिवाराचा सांभाळ करण्यासाठी आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू नये या उद्देशाने सरकारने ही योजना लागू केली आहे
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी 28 जून 2024 रोजी या योजनेची घोषणा केली आहे आतापर्यंत सरकारने योजनेअंतर्गत सात हप्त्याचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा केलेले आहेत आता महिला या योजनेच्या आठव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे अशातच महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे सरकारकडून आठवा हप्ता जमा करण्याची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे तर आठव्या हप्त्यामध्ये महिलांना 2100 रुपये मिळणार का यासंदर्भात सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत.
Table of Contents
Ladki Bahin Yojana 8th Kist Overview
योजनेचे नाव | मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना |
योजनेची अंमलबजावणी | 28 जून 2024 |
राज्य | महाराष्ट्र |
लाभार्थी | आर्थिक दृष्ट्या गरीब परिवारातील महिला |
आर्थिक मदत | 1500 रुपये महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन व ऑफलाईन |
Ladki Bahin Yojana Official website | https://ladakibahin.maharashtra.gov.in/ |
हेल्पलाइन नंबर | 181 |
फेब्रुवारी महिन्याचा 8 वा हाप्ता या दिवशी जमा होणार
महाराष्ट्र सरकारने गरीब कुटुंबाला महिलाना आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेच्या माध्यमातून सरकारने 24 जानेवारी 2025 पासून या योजनेचा सातवा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला त्यामध्ये दोन करोड पेक्षा अधिक महिलांच्या खात्यात 1500 रुपये 31 जानेवारी 2025 पर्यंत जमा झाले.
आता महिला या योजनेच्या आठव्या हप्त्याची वाट पाहत आहे अशातच महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे सरकारकडून 15 फरवरी 2025 ते 20 फरवरी 2025 या कालावधीमध्ये पात्र महिलांच्या खात्यात ह्या योजनेचा सातवा हप्ता जमा केला जाणार आहे
हे पण वाचा : या लाडक्या बहिणींच्या अर्जाची पडताळणी होणार, तयार ठेवा हे 4 कागदपत्रे
या महिलांना मिळणार नाही या योजनेचा आठवा हप्ता
महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात 15 फरवरी 2025 पासून जमा करण्यात येणार आहे परंतु अनेक महिलांना या योजनेचा आठवा हप्ता मिळणार नाही आहे
![Ladki Bahin Yojana 8th Kist](https://majhiladkibahin.in/wp-content/uploads/2025/02/Ladki-Bahin-Yojana-8th-Kist-1024x538.webp)
मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार ज्या महिलांच्या कुटुंबाच्या सदस्याच्या नावे चार चाकी वाहन आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही परिवहन विभागाकडून चार चाकी वाहन मालकांची माहिती घेऊन या संदर्भात कारवाई सरकार करणार आहे.
आता मिळणार महिलांना ₹2100 रुपये ?
महायुती सरकारकडून विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महिलांना आश्वासन देण्यात आले होते की जर राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुती सरकार स्थापन झाल्यात लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रकमेतून वाढ करून 2100 महिना दिला जाईल व महिलांच्या आशीर्वादाने राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन झाले परंतु महिलांना आतापर्यंत 2100 रुपयांचा हप्ता देण्यात आलेला नाही.
यासंदर्भात माहिती मिळाली असता सरकारकडून नवीन अर्थसंकल्पात या संदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे व त्यानंतर महिलांना मार्च महिन्यानंतर या योजनेअंतर्गत 2100 रुपये महिना दिला जाणार अशी माहिती समोर येते.
FAQ- Ladki Bahin Yojana 8th Kist
फेब्रुवारी महिन्याचा आठवा महिलांच्या खात्यात कधी जमा होणार ?
महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात 15 फरवरी 2025 ते 20 फरवरी 2025 पर्यंत जमा केला जाणार अशी माहिती समोर येत आहे.
![CHANDRAKANT GHODKE](https://majhiladkibahin.in/wp-content/uploads/2024/08/CHANDRAKANT.jpg)
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .