Ladki Bahin Yojana 2100 Installment News In Marathi : महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक लाभ देण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना सरकार 1500 महिना देत आहे परंतु विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुती सरकारने राज्यातील महिलांना आश्वासन दिले होते की जर महिलांच्या आशीर्वादाने महायुती सरकार पुन्हा राज्यात स्थापन झाल्यास लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना आम्ही 2100 रुपये महिना देऊ
अशातच लाडक्या बहिणीच्या आशीर्वादाने राज्यांमध्ये पुन्हा एकदा महायुती सरकार स्थापन झाले त्यानंतर सरकारने डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा केले त्यामध्ये महिलांना फक्त पंधराशे महिना मिळाला त्यामुळे महिलांना प्रश्न पडला आहे की सरकार लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2100 रुपये महिना कधी देणार आहे तर आज आपण या संदर्भात सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत.
लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पडताळणी सुरू
महाराष्ट्र सरकारने राज्यातील गरीब कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना सुरू केली परंतु अनेक महिलांनी या योजनेच्या निकषाचे पालन न करता लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करून त्या महिला या योजनेचा लाभ घेत आहे सरकारने सुरुवातीला लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पडताळणी योग्य प्रकार न केल्यामुळे पाच लाखापेक्षा अधिक अपात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.
ही बाब सरकारची लक्षात आल्यानंतर सरकारकडून महिला व बाल विकास विभागामार्फत लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पुन्हा फिर पडताळणी करण्यास सुरुवात केलेली आहे अंगणवाडी कर्मचारी महिलांच्या घरोघरी जाऊन अर्जाची पडताळणी करणार आहे ज्या महिला या योजनेच्या निकषात बसत नाहीत अशा महिलांना या योजनेतून अपात्र घोषित केले जाणार.
हे पण वाचा : आनंदाची बातमी पुढील 48 तासात जमा होणार फरवरी महिन्याचा हप्ता
लाडक्या बहिणींना 2100 रुपये या दिवशी मिळणार
महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राज्यातील लाडक्या बहिणींना आश्वासन दिले होते की राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकार स्थापन झाल्यास लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना 2100 रुपये महिना देऊ अशातच महायुती सरकारला मोठ्या प्रमाणात विधानसभा निवडणुकीत यश प्राप्त झाले व महायुती सरकार राज्यात पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात स्थापन झाले.
त्यानंतर महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा केलेले आहेत परंतु त्यामध्ये महिलांना पंधराशे रुपये देण्यात आला तर महिलांना 2100 रुपये कधीपासून मिळणार आहेत असा प्रश्न निर्माण केला जात आहे.

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारकडून नवीन आर्थिक वर्षात लाडकी बहीण योजनेच्या वाढीव हप्त्या संदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे त्यामुळे महिलांना मार्च महिन्यानंतर या योजनेअंतर्गत 2100 रुपये महिना मिळणार अशी माहिती समोर येत आहे.

नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .