Ladki Bahin Yojana April List News In Marathi : महाराष्ट्र राज्यातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेमुळे महायुती सरकारला मागील झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या संख्येने यश प्राप्त झाले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुती सरकार स्थापन झाले .
या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील महिलांना महाराष्ट्र सरकार प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये देत आहे या योजनेचा लाभ घेऊन महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम होतील या उद्देशाने सरकारने हि योजना सुरू केली आहे.
या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत सरकारने नऊ हप्त्याचे पैसे दोन कोटी पेक्षा अधिक पात्र महिलांच्या खात्यात जमा केलेले आहेत आता महिला या योजनेच्या एप्रिल महिन्याच्या त्याची आतुरतेने वाट पाहत आहे अशातच सर्व पात्र महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे
महाराष्ट्र सरकारकडून एप्रिल महिन्याचा हप्ता जमा करण्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे त्याचप्रमाणे या योजनेतून अनेक महिलांना वगळण्यात आलेले आहे आणि अंतिम मंजूर यादी जाहीर करण्यात आली आहे तर आज आपण या संदर्भात सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत
या दिवशी जमा होणार एप्रिल महिन्याचा हप्ता
महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा आठवा आणि नववा हप्ता एकत्रितपणे महिला दिवसाचे निमित्त साधून 7 मार्च ते 12 मार्च कालावधीमध्ये दोन कोटी पेक्षा अधिक पात्र महिलांच्या खात्यात लाभ जमा केलेला आहे आता महिला या योजनेच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहे अशा सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे महाराष्ट्र सरकारकडून दोन टप्प्यांमध्ये एप्रिल महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा केला जाणार आहे.
पहिला टप्पा हा 24 एप्रिल पासून सुरू करण्यात येणार आहे त्यामध्ये एक करोड पेक्षा अधिक महिलांच्या खात्यात लाभ जमा केला जाणार आहे त्यानंतर 27 एप्रिल पासून दुसऱ्या टप्प्यामध्ये लाभ वितरित केला जाणार आहे आणि 30 एप्रिल पर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात लाभ जमा केला जाणार आहे
या महिलांना मिळणार साडेचार हजार रुपये
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यात सरकारने मागील महिन्यात फरवरी आणि मार्च महिन्याच्या एकत्रितपणे हप्ता जमा केलेला होता परंतु अनेक महिलांना मार्च महिन्यामध्ये एकही हप्त्याचा पैसा मिळाला नाही यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारकडून एप्रिल महिन्याच्या हप्त्यामध्ये फरवरी, मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता एकत्रपणे साडेचार हजार रुपये जमा केला जाणार आहे.
हे पण वाचा : लाडक्या बहिणींना टेन्शन देणारी बातमी, या महिलांना एप्रिलचा 10 वा हप्ता मिळणार नाही
एप्रिल महिन्याची नवीन मंजूर यादी जाहीर
महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी काही निकष ठेवलेले आहेत परंतु अनेक महिलांनी या योजनेच्या निकषाचे पाल न करता लाखो महिला या योजनेचा लाभ घेत आहे या संदर्भात सरकारने पडताळणी केली असता लाखो महिला त्यामध्ये अपात्र ठरलेल्या आहेत ज्या महिलांच्या परिवाराचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे.
त्याचप्रमाणे महिलांच्या परिवारातील कुटुंबाच्या सदस्याच्या नावे चार चाकी वाहन आहे व तसेच महिला किंवा महिलांच्या परिवारातील सदस्य सरकारी नोकरीवर आहे अशा महिलांना सरकारने योजनेतून वगळलेले आहे
त्याचप्रमाणे ज्या महिलांना नमो शेतकरी सन्मान निधी योजना व प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना चा लाभ घेत आहे अशा महिलांना सरकार लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपये ऐवजी फक्त 500 रुपये महिना देणार आहे.

नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .