Ladki Bahin 6th New Update In Marathi : मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत 2 कोटी 34 लाख महिलांना महाराष्ट्र सरकारने लाभ दिलेले आहे आता महिला या योजनेच्या सहाव्या हप्त्याची वाट महिला आतुरतेने पाहत आहे परंतु सध्या लाडक्या बहिणीच्या अर्जाची पुन्हा पडताळणी होणार असून निकषांत न बसणाऱ्या महिलांना योजनेतून बाद केले जाईल असी चर्चा सध्या सुरू आहे यावर आमदार अदिती तटकरे यांनी दिलासादाय स्पष्टीकरण दिलेली आहे तर आज आपण या संदर्भात संपूर्ण माहिती पुढे पाहणार आहोत.
Table of Contents
लाडक्या बहिणीच्या अर्जाची पुन्हा होणार पडताळणी
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना लाडकी बहीण योजने संदर्भात उत्तर देताना ते म्हणाले लाडक्या बहिणीच्या अर्जाची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे सरसकट महिलांना लाभ दिला जाणार नाही निकषांत बसणाऱ्या गरजू महिलांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल असे मुख्यमंत्री म्हणाले त्यामुळे महिलांच्या अर्जाची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे असी चर्चा सुरू आहे.
त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2100 रुपये देण्यासंदर्भात जे आम्ही आश्वासन दिलं होतं ते आम्ही पूर्ण करणार व लाडकी बहीण योजना आम्ही बंद पडू देणार नाही व तसेच गरीब कोणतीही महिला या योजनेपासून वंचित राहू नये याची काळजी पण आम्ही घेऊ असेहि मुख्यमंत्री म्हणाले.
हे पण वाचा : नवीन अपात्र यादी जाहीर, लाखो महिला झाल्या अपात्र , अशा प्रकारे चेक करा तुमचे नाव
लाडक्या बहिणीसाठी आदिती तटकरे यांचा मोठा दिलासा
आमदार अदिती तटकरे हे माध्यम मशीन बोलताना म्हणाल्या शेवटी कुठले निकष कशा पद्धतीने लावले जातील व तसेच कशा प्रकारे बदले जातील यासंदर्भात जर एखादी तक्रार प्राप्त झाली तर त्या संदर्भात छाननी करायची का नाही हा निर्णय सरकारचा असतो परंतु अद्याप तर आता पर्यंत अशासंदर्भात चर्चा झाली नाही कुठेही चौकशी किंवा कारवाई करायचा विषय आलेला नाही असे त्यांनी स्पष्ट केले त्यामुळे लाडक्या बहिणीच्या अर्जाची पडताळणी करण्याचा निर्णय सरकारने सध्या तरी घेतलेला नाही.
पुढील 48 तासात महिलांच्या खात्यात जमा होणार पैसे
राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुती सरकार स्थापन झालेले आहे आणि महिला या योजनेच्या सहाव्या हप्त्याच्या प्रतीक्षा मध्ये आहे अशातच महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र सरकारकडून पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये या योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहे अशी माहिती भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी यांनी दिलेली आहे त्यामुळे महिलांना चिंता करायची आवश्यकता नाही लवकरच योजनेचे पैसे जमा होणार आहेत.
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .
1 thought on “Ladki Bahin 6th New Update : आनंदाची बातमी सरकारने घेतला लाखो महिलांसाठी मोठा निर्णय, अदिती तटकरे यांनी दिली माहिती”