Ladki Bahin Pending Kist Update : उर्वरित महिलांना या दिवशी मिळणार सर्व पैसे, पहा संपूर्ण माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ladki Bahin Pending Kist Update News In Marathi : महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक सहायता करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली या योजनेला महिलांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आणि या योजनेसाठी महाराष्ट्र सरकारकडे 2.5 कोटी पेक्षा अधिक ऑनलाईन व ऑफलाइन अर्ज प्राप्त झाले त्यामधील पात्र महिलांना पाच हप्त्याचे पैसे 7500 हजार रुपये पण जमा करण्यात आले.

परंतु अशा अनेक महिला आहेत ज्यांना या योजनेचा एकही हप्ता मिळालेला नाही तर अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार का नाही असे चर्चा सध्या सुरू आहे तर आज आपण अशा महिलांना या योजनेचा पैसा कधी मिळणार आणि ते किती मिळणार यासंदर्भात सविस्तर माहिती पुढील पाहणार आहोत.

अर्ज मंजूर पण का जमा केले जात नाही पैसे

महाराष्ट्र सरकारने सांगितलेल्या सर्व अटी व शर्तीचे पालन करून महिलांनी या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज केला त्यानंतर त्यांचा अर्ज पण मंजूर करण्यात आला परंतु ऑक्टोबर महिना होऊन गेला आणि या योजनेचा एकही हप्ता त्यांना मिळाला नाही अशा महिला चिंतित आहे की आम्हाला या योजनेचा लाभ मिळणार का नाही ? तर या संदर्भात माहिती मिळाल्या असता काही तांत्रिक अडचणीमुळे व महिलांची खाते आधारल लिंक नसल्यामुळे या योजनेचा लाभ महिलांना मिळाला नाही.

Ladki Bahin Pending Kist Update
Ladki Bahin Pending Kist Update

आता सध्या महाराष्ट्र राज्यांमध्ये आचारसंहिता लागू आहे त्यामुळे या योजनेचा लाभ महिलांच्या खात्यात जमा करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महिला व बालविकास विभागाने ब्रेक केलेला आहे त्यामुळे आचारसंहिता समाप्त झाल्यानंतर अशा सर्व महिलांच्या खात्यात या योजनेचा पैसा जमा होईल.

हे पण वाचा : Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना आता मिळणार 2100 रुपये , फक्त याच महिला आहे पात्र

उर्वरित महिलांना या दिवशी मिळणार सर्व पैसे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महिलांना 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये देण्यासंदर्भात मोठी घोषणा करण्यात आलेली आहे पुन्हा महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर हा लाभ महिलांच्या खात्यात जमा केला जाईल त्याचप्रमाणे एका प्रचार सभेत माहिती देताना ते म्हणाले की राज्यामधील विधानसभा निवडणूक संपल्यानंतर सहाव्या हप्त्याचे पैसे नोव्हेंबर महिन्यामध्येच महिलांच्या खातात जमा केले जाणार

त्याचप्रमाणे ज्या महिलांना या योजनेचा एकही हप्ता मिळाला नाही अशा सर्व महिलांना पण सर्व हप्त्याचे पैसे नोव्हेंबर महिन्यामध्ये मिळतील.

3 thoughts on “Ladki Bahin Pending Kist Update : उर्वरित महिलांना या दिवशी मिळणार सर्व पैसे, पहा संपूर्ण माहिती”

  1. अजून मला एकही हफ्ता नाही मिळाला आहे. Approve असून सुधा. असे का करतात. एकाला एक आणि दुसऱ्याला एक.

    Reply

Leave a Comment