Ladki Bahin Yojana 10th Instalment News In Marathi : महाराष्ट्र राज्यामध्ये मागील काही महिन्यापासून लाडकी बहीण योजनेची जोरदार चर्चा सुरू आहे या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार पात्र असलेल्या महिलांना पंधराशे रुपये महिना देत आहे या योजनेची सुरुवात महाराष्ट्र सरकारने जुलै 2024 पासून सुरू केली आहे व मार्च महिन्यापर्यंतचे नऊ हप्ते पात्र महिलांच्या खात्यात जमा केले.
अशातच आता महिलांसाठी पुन्हा एक आनंदाची बातमी समोर येत आहे लाडक्या बहिणीच्या खात्यात एप्रिल महिन्याचा हप्ता जमा करण्याची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे तर आज आपण या संदर्भात सविस्तर माहिती पुढील पाहणार आहोत.
Table of Contents
13500 रुपये महिलांच्या खात्यात जमा
महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना 28 जून 2024 रोजी राज्यात लागू केली आणि गरीब कुटुंबातील महिलांना या योजनेच्या माध्यमातून पंधराशे रुपये महिना मिळू लागला आतापर्यंत सरकारने जुलै ते मार्च महिन्यापर्यंतचे 13500 रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा केलेले आहेत लाडक्या बहिणींना फरवरी आणि मार्च महिन्याचा हप्ता सरकाने एकत्रितपणे जमा केला आहे.
50 लाख महिला होणार अपात्र ?
उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची माहिती दिली आहे ज्या महिलांचे नावे या योजनेतून बाद झाली आहेत त्या महिलाकडून सरकार पैसे परत घेणार नाही परंतु या योजनेतून 50 लाख महिला अपात्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे अशातच नऊ लाख महिला आतापर्यंत अपात्र ठरलेले आहेत त्यामुळे ज्या महिला या योजनेसाठी अपात्र ठरलेल्या आहेत त्यांना योजने अंतर्गत पुढे लाभ मिळणार नाही.
हे पण वाचा : लाडकी बहीण योजनेची नवीन अर्ज प्रक्रिया, अशा प्रकारे करा Online अर्ज सादर फक्त 5 मिनिटात, पहा संपूर्ण माहिती
एप्रिल महिन्याचा हप्ता या तारखेला जमा होणार
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र सरकारकडून लाडक्या बहिणीच्या खात्यात दोन महिन्याचे पैसे तीन हजार रुपये 8 मार्च 2025 ला महिलांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात केली व 12 मार्चपर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा झाले.

आता महिला एप्रिल महिन्याच्या 10 व्या हप्त्याची वाट पाहत आहे अशातच महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार लाडक्या बहिणीच्या खात्यात एप्रिल महिन्याचा हप्ता 6 एप्रिल ते 10 एप्रिल या कालावधीमध्ये जमा केला जाणारा अशी माहिती समोर येत आहे.
हे पण वाचा : नवीन वर्षाचे 3 मोफत गॅस सिलेंडर वाटप सुरू, लगेच करा अशा प्रकारे ऑनलाईन अर्ज
एप्रिल महिन्यात 1500 मिळणार की 2100 रुपये
महाराष्ट्र सरकारने मागील झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान लाडक्या बहिणींना आश्वासन दिले होते की राज्यांमध्ये पुन्हा एकदा महायुती सरकार स्थापन झाल्यास लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 ऐवजी 2100 रुपये महिना देऊ अशातच महिलांच्या आशीर्वादाने राज्यांमध्ये महायुती सरकार स्थापन झाले .
परंतु मार्च महिना निघून गेला आतापर्यंत सरकारने लाडक्या बहिणींना या योजनेअंतर्गत 2100 रुपये देण्याचा कोणताच निर्णय घेतलेला नाही त्यामुळे सध्या तरी महिलांना एप्रिल महिन्यामध्ये पंधराशे रुपये वरच समाधान मानावे लागेल.
परंतु राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात स्पष्ट माहिती दिली आहे की महिलांना लवकरच या योजनेअंतर्गत 2100 रुपये महिन्यात देण्याचा निर्णय आम्ही घेऊ.

नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .