Ladki Bahin Yojana 3rd Kist : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्याची एक अत्यंत महत्त्वकांक्षी योजना आहे राज्यातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये ही योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार आर्थिक दृष्ट्या व गरीब परिवारातील महिलांना पंधराशे रुपये प्रति महिना देत आहे आणि या योजनेअंतर्गत आतापर्यंत दोन टप्प्यांमध्ये लाखो महिलांच्या खात्यात या योजनेचा पैसा जमा करण्यात आलेला आहे
परंतु अशा अनेक महिला आहेत ज्यांच्या अर्ज मंजूर आहेत परंतु त्यांना पैसे मिळाले नाही आणि अशा सर्व महिला या योजनेच्या तिसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा करत आहे अशा सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता ( Ladki Bahin Yojana 3rd Kist ) महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे
या संदर्भात सरकारने काही तारखा दिलेले आहेत त्या तारखांच्या आत मध्ये सर्व पात्र महिलांना या योजनेचा पैसा मिळणार आहे आणि त्याच प्रमाणे ज्या महिलांना पैसा अद्याप जमा होणार नाही अशा महिलांना सरकारने काही दिशा निर्देश दिलेले आहेत ते पूर्ण केल्यानंतर त्यांना पण या योजनेचा हप्ता मिळणार आहे या संदर्भात संपूर्ण आपण पुढे पाहूया.
Ladki Bahin Yojana 3rd Kist Overview
योजनेचे नाव | मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना |
वर्ष | 2024 |
राज्य | महाराष्ट्र |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब परिवारातील महिला |
आर्थिक मदत | पंधराशे रुपये प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन/ऑफलाइन |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 30 सप्टेंबर 2024 |
Ladki Bahin Yojana Official Website | https://ladakibahin.maharashtra.gov.in |
हेल्पलाइन नंबर | 181 |
अर्ज मंजूर पण का मिळाले नाहीत पैसे ?
राज्यातील अशा अनेक महिला आहेत ज्यांच्या अर्ज जुलै आणि अगस्ट महिन्यातच मंजूर झालेले आहेत परंतु त्यांना आतापर्यंत या योजनेचा एकही रुपया मिळालेला नाही यासंदर्भात महिलांकडून प्रश्न निर्माण केले जात आहे की आम्हाला पैसे आतापर्यंत का मिळाले नाही या संदर्भात सरकारने स्पष्ट सांगितले होते की अनेक महिलांनी आपले बँक खाते आधार लिंक न केल्यामुळे त्यांना योजनेचा पैसा मिळालेला नाही त्यासाठी महिलांनी आपली खाते आधार लिंक करून घ्यावी असे सरकारने आवाहन केले आहे
हे पण वाचा : लाडकी बहीण योजनेची नवीन अर्ज प्रक्रिया, अशा प्रकारे करा Online अर्ज सादर फक्त 5 मिनिटात
तिसऱ्या टप्प्यांमध्ये किती पैसे मिळणार आहेत ?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांनी अर्ज केलेले आहेत आणि ज्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत परंतु त्यांना आतापर्यंत एकही रुपये मिळाले नाही अशा सर्व महिलांना सरकार चार हजार पाचशे रुपये त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात जमा करणार आहेआणि ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून 3000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये मागील दिवसांमध्ये जमा झालेले आहेत अशा महिलांना या तिसऱ्या हप्त्यात दीड हजार रुपये त्यांच्या बँकेत जमा केले जाणार आहेत.
महिलांना 4500 रुपये जमा होणे सुरू
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता ( Ladki Bahin Yojana 3rd Kist ) महाराष्ट्र सरकार ने जमा करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार 28 ते 30 सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये सर्व पात्र महिलांच्या खात्यात या योजनेचा पैसा जमा होण्याची शक्यता आहे परंतु या योजनेचा पैसा फक्त आधार लिंक खात्यामध्ये जमा केला जात आहे त्यासाठी महिलांनी आपले खाते आधार लिंक करून घ्यावे असे आव्हान सरकारकडून करण्यात येत आहे.
पैसे जमा झाले नाहीत तर हे करा काम
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जर तुम्ही अर्ज केलेला आहे आणि तुमचा अर्ज मंजूर पण झाला आहे आणि तुमचे बँक खाते आधार लिंक पण आहे तरी पण तुम्हाला या योजनेचा पैसा मिळालेला नाही त्यासाठी सरकारने एक पर्याय उपलब्ध केलेला आहे तुम्हाला सरकारच्या अधिकृत हेल्पलाइन नंबर १ ८ १ ला कॉल करून या संदर्भात तक्रार करायची आहे तुमच्या तक्रारीचे निवारण करून तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाणार.
Ladki Bahin Yojana 3rd Kist Important Link
Ladki Bahini Yojana Online Apply Link | Click Here |
Ladki Bahin Online Offline Aadhar Link | Click Here |
Ladki Bahin Aadhar Link Check | Click Here |
Ladki Bahin Yojana Approved 3rd List | Click Here |
Ladki Bahin Yojana Balance Check | Click Here |
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .
1 thought on “Ladki Bahin Yojana 3rd Kist : लाडकी बहीण योजनेचे पैसे 4500 जमा होणे सुरू, नाही जमा झाले तर हे करा काम”