Ladki Bahin Yojana 6 hapta : लाडक्या बहिणींना सरकारन दिल डबल गिफ्ट, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारची मोठी घोषणा,

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ladki Bahin Yojana 6 hapta News In Marathi : महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणीसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे सरकारकडून लाडक्या बहिणींना दुहेरी गिफ्ट देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आलेला आहे महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै ते नोव्हेंबर महिना पर्यंतचे सर्व हाप्ते महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहेत.

आता महिलांना या योजनेच्या सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे अशातच महाराष्ट्र सरकारकडून अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लाडकी वहिनी योजने संदर्भात मोठी घोषणा करण्यात आलेली आहे या संदर्भात महत्त्वाचा निर्णय पण घेण्यात आलेला आहे तर आज आपण या संदर्भात संपूर्ण माहिती सविस्तर पुढे पाहणार आहोत.

लाडकी बहीण योजनेची थोडक्यात माहिती

महाराष्ट्र सरकारने ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन लाख पन्नास हजार रुपये पेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये देण्यास सुरुवात झाली या योजनेसाठी अंतिम अर्थसंकल्पामध्ये मंजुरी मिळाली आणि या योजनेची घोषणा राज्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून करण्यात आली होती आणि जुलै महिन्यापासून या योजनेची अंमलबजावणी सरकारकडून सुरू करण्यात आली.

जुलै ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये पात्र महिलांच्या खात्यात सरकारकडून पाच हप्त्याचे पैसे साडेसात हजार रुपये जमा करण्यात आले आचारसहिता लागू होत असल्यामुळे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता ऍडव्हान्स मध्ये महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला त्यामुळे ऑक्टोबर महिन्यातच महिलांच्या खात्यात एकाच वेळी तीन हजार रुपये सरकारकडून जमा करण्यात आले परंतु आता लाडक्या बहिणींची लक्ष डिसेंबर महिन्याच्या हप्त्याकडे लागलेला आहे.

कधी मिळणार 2100 रुपये ? मुख्यमंत्री यांनी दिली माहिती

महायुतीच्या अनेक नेत्यांकडून विधानसभा निवडणुकीच्या प्रचार दरम्यान महिलांना आश्वासन दिले होते की राज्यामध्ये पुन्हा महायुती सरकार स्थापन झाल्यास या योजनेअंतर्गत 1500 रुपये महिना 2100 रुपये महिना देऊ अशी घोषणा करण्यात आली होती आता राज्यामध्ये महायुती सरकार स्थापन झालेले आहे त्यामुळे महिलांना 2100 रुपये कधीपासून मिळणार याची उत्सुकता महिलांना लागलेली आहे.

या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसापूर्वी सांगितले होते की या योजनेसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येईल आणि ही योजना कायम सुरूच राहील त्यामुळे महिलांना या योजनेअंतर्गत 2100 रुपये मिळणार आहे हे निश्चित झालेला आहे.

हे पण वाचा : लाडक्या बहीनेचे अर्ज मंजूर आणि खाते आधार लिंक तरी पण का जमा झाले नाही पैसे ?

Ladki Bahin Yojana 6 hapta

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारची मोठी घोषणा

महाराष्ट्र सरकारकडून हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यातील कोटीवधी लाडक्या बहिणीसाठी मोठ गिफ्ट दिलेल आहे आज विधानसभेमध्ये 35788 कोटीच्या पुरवणी मागण्या मंजूर झाल्या असून त्यामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.

त्याचप्रमाणे मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेसाठी 350 कोटी तर सार्वजनिक बांधकाम विभागातील रस्ते आणि पूल बांधण्यासाठी 1500 कोटी, मोदी आवास घरकुल योजनेसाठी 1250 कोटी, मुंबई मेट्रो साठी 1212 कोटी, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेसाठी 514 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.

लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटीची तरतूद

महायुती सरकारला सत्तेत पुन्हा येण्यासाठी लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरलेली आहे अशातच या योजनेसाठी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 1400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे या योजनेतील तांत्रिक बाबीची पूर्तता करण्यासाठी ही तरतूद करण्यात आल्याचा समजले जात आहे परंतु या योजनेअंतर्गत 2100 रुपये महिना देण्यासंदर्भात अद्याप तरतूद करण्यात आलेले नाही त्यामुळे महिलांना पुन्हा काही दिवस 2100 रुपयाची प्रतीक्षा करावी लागेल.

Leave a Comment