Ladki Bahin Yojana 6 Instalment News In Marathi : महाराष्ट्र सरकारने महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेच्या माध्यमातून जुलै ते नोव्हेंबर पर्यंतचे पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले परंतु महिला या योजनेच्या सहाव्या हप्त्याची वाट पाहत आहे महाराष्ट्र सरकारने अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विविध समाज योजनांसाठी 35 हजार 788 कोटी रुपयांचा पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या आहे .
त्यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली पण लाडक्या बहिणी या योजनेचा सहावा हप्ता जमा होण्याची वाट पाहत आहे तर या संदर्भात कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती दिलेली आहे ते आपण सविस्तर पुढे पाहूया.
कॅबिनेट मंत्री उदय सामंत काय म्हणाले
राज्यामध्ये महायुती सरकारला लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरलेली आहे कारण लाडकी बहीण योजनेच्या मदतीने महायुती सरकार पुन्हा सत्तेत परत आलेली आहे अशातच राज्यातील 2 कोटी 34 लाख महिला लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्याची वाट पाहत आहे यासंदर्भात कॅबिनेट मंत्री उदय सामंत माध्यमांशी बोलताना म्हणाले की अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लाडकी बहीण योजने करिता 1400 रुपये कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे यामुळे लाडकी बहीण योजनेचे पुढील हप्ते महिलांच्या खात्यात लवकरच जमा केले जातील.
हे पण वाचा : खुशखबर लाडक्या बहिणींची संक्रांतर गोड होणार, डिसेंबर जानेवारीचे ₹3000 रुपये एकत्र मिळणार?
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीपासून मिळणार
महायुती सरकारकडून विधानसभा निवडणुकीदरम्यान महिलांना आश्वासन दिले होते की राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकार आल्यास लाडकी बहीण योजनेच्या लाभांमध्ये वाढ करून ते 2100 रुपये देण्यात येईल आणि लाडकी बहीण योजनेच्या मदतीने महायुती सरकारला मोठ्या संख्येने बहुमत मिळाले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुती सरकार स्थापन झाली.
पण महिलांना या योजनेअंतर्गत 2100 रुपये महिना कधीपासून मिळणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचार माध्यमशी बोलताना सांगितले की आम्ही जे आश्वासन महिलांना दिलेले आहोत ते आश्वासन आम्ही नक्की पूर्ण करणार त्यामुळे लाडक्या बहिणींना या योजनेअंतर्गत 2100 रुपये महिना देण्यात येणार आहे परंतु हे पैसे कधी पासून मिळणार या संदर्भात सरकारकडून कुठलाच निर्णय घेण्यात आलेला नाही.
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .