Ladki Bahin Yojana 8th 9th installment News In Marathi : महाराष्ट्र सरकारची सर्वात चर्चेत असलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजना या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार पात्र महिलांना पंधराशे महिना देत आहे आतापर्यंत सरकारने योजनेअंतर्गत जानेवारीपर्यंत पैसे महिलांच्या खात्यात जमा केलेले आहेत अशातच महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र सरकारने फरवरी महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात केलेली आहे.
परंतु अनेक महिलांना या योजनेचा आठवा हप्ता जमा झालेला नाही पण त्याचप्रमाणे महिलांच्या मनामध्ये प्रश्न आहे की सरकारने मार्च महिन्याचे पैसे एकत्रित देऊ असे सांगितले होते परंतु महिलांना फक्त पंधराशे मिळाले तर आज आपण या ( Ladki Bahin Yojana 8th 9th installment) संदर्भात सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत.
महिलांच्या खात्यात आठवा हप्ता जमा
राज्यातील दोन कोटी पेक्षा अधिक लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला योजनेच्या आठव्या हप्त्याची वाट पाहत होती कारण फरवरी महिला संपून गेला तरी पण महिलांच्या खात्यात फरवरी महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही अशातच सरकारकडून 07 मार्च पासून महिलांच्या खात्यात फरवरी महिन्याचा हप्ता जमा करण्यास सुरुवात झाली आहे त्यामध्ये एक कोटी पेक्षा अधिक महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहे.
लाडक्या बहिणींना ₹3000 हजार रुपये मिळणार
महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी मीडियाला या योजने संदर्भात महत्त्वाची माहिती दिली त्या म्हणाल्या राज्यातील महिला फरवरी महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहे परंतु अर्जाच्या फेर पडताळणीच्या कारणामुळे महिलांच्या खात्यात फरवरी महिन्याचा हप्ता जमा करण्यात आलेला नाही त्यामुळे महिलांना फरवरी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्रितपणे जमा केला जाईल असे त्यांनी स्पष्ट सांगितले होते.
अशातच महाराष्ट्र सरकारकडून 7 मार्च रोजी महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा करण्यास सुरुवात झाली त्यामध्ये करोडो महिलांच्या खात्यात पैसे जमा पण झालेले आहे आणि लवकरच मार्च महिन्याचे पैसे पण महिलांच्या खात्यात जमा केले जाईल असे एकत्रित मिळून महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होणार आहे.
मार्च महिन्याचा हप्ता कधी जमा होणार
महाराष्ट्र सरकारकडून लाडक्या बहिणीच्या खात्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा फरवरी महिन्याचा हप्ता सात मार्च रोजी जमा करण्यात आलेला आहे उर्वरित महिलांचे खात्यात पुढील एक ते दोन दिवसांमध्ये पैसे जमा होतील परंतु मार्च महिन्याचा हप्ता महिलांचे खात्यात कधी जमा होणार असा प्रश्न निर्माण झालेला आहे
या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारकडून महिला दिवस रोजी मार्च महिन्याचा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये मार्च महिन्याचे पण पैसे महिलांच्या खात्यात जमा होणार आहे.
Check Payment Status

नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .
1 thought on “Ladki Bahin Yojana 8th 9th installment : महिलांसाठी आनंदाची बातमी, लाडकी बहीण योजनेचे ₹3000 हजार रुपये जमा होणे सुरू”