Ladki Bahin Yojana New From News In Marathi : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेची 2024-25 च्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून तरतूद करण्यात आलेली आहे ही योजना 28 जून 2024 रोजी महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली आहे या योजनेच्या मदतीने आर्थिक दृष्ट्या व गरीब परिवारातील महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी ही योजना सरकारने चालू केलेली आहे या योजनेचा लाभ घेऊन महिला आपल्या परिवाराचा योग्य प्रकारे सांभाळ करू शकतील त्याचप्रमाणे त्यांना अडचणीचा सामना करावा लागू नये याकरिता ही योजना सुरू करण्यात आली आहे.
आतापर्यंत सरकारने या योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्यापर्यंत सर्व पैसे पात्र महिलांना दिलेले आहेत परंतु राज्यांमध्ये अशा अनेक महिला आहेत त्यांना योग्य प्रकारे माहिती न मिळाल्यामुळे त्या महिला या योजनेसाठी अर्ज करू शकलेल्या नाहीत अशा सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे राज्याची महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्याकडून लाडकी बहीण योजनेच्या नवीन अर्ज प्रक्रिया संदर्भात मोठी माहिती दिलेली आहे ती आपण सविस्तर पुढे पाहणार आहोत.
महिलांच्या खात्यात ह्या तारखेपर्यंत जमा होणार डिसेंबरचा हप्ता
मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यात सरकारकडून 24 डिसेंबर पासून डिसेंबर महिन्याचे पैसे जमा केले जात आहे परंतु अनेक महिलांचे पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा झालेले नाही यासंदर्भात माहिती मिळाली असता अशा महिलांनी पुढील दोन ते तीन दिवस वाट पहावी लागेल त्यामुळे उर्वरित महिलांच्या खात्यात 27 ते 30 डिसेंबर या कालावधीमध्ये पैसे जमा होतील.
हे पण वाचा : फ्री 3 गॅस सिलेंडर वाटप प्रक्रिया सुरू, लाडक्या बहिणींनो लगेच करा अर्ज सादर
लाडकी बहीण योजनेची नवीन अर्ज प्रक्रिया सुरू होणार ?
महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केली होती महिला स्वतः किंवा सेतू केंद्र/अंगणवाडी केंद्र मार्फत अर्ज करू शकत होत्या सरकारकडून 1 जुलै 2024 ते 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत महिलांना अर्ज करण्याची वेळ दिलेली होती. या कालावधीमध्ये 3 कोटीच्या जवळपास सरकारकडे अर्ज प्राप्त झाले.
त्यापैकी सरकारने 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत 2 कोटी 34 लाख महिलांना नोव्हेंबर पर्यंतचे पैसे त्यांना देण्यात आले त्यानंतर सरकारने 24 डिसेंबर पासून डिसेंबर महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात केली. परंतु राज्यांमध्ये अशा अनेक महिला आहेत ज्यांना योग्य प्रकारे माहिती न मिळाल्यामुळे त्या महिला या योजनेसाठी अर्ज करू शकलेला नाही अशा महिलांसाठी सरकार पुन्हा नवीन अर्ज प्रक्रिया सुरू करणार का ?
यासंदर्भात मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार महिला व बालविकास मंत्री अति तटकरे यांना प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत लाडकी बहीण योजनेच्या अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ त्याची का नाही याबद्दल निर्णय होईल असं त्यांनी स्पष्ट केलेले आहे यापूर्वी सरकारकडून 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत करण्याची शेवटची तारीख दिली होती.
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .