Ladki Bahin Yojana New GR 2025 Detail In Marathi : महाराष्ट्र सरकारने विधानसभा निवडणुकीच्या अगोदर लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली या योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरीब कुटुंबातील महिलांना १ ५ ० ० महिना देण्यास सुरुवात झाली व त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीच्या अनेक नेत्यांकडून आश्वासन देण्यात आले होते की जर महायुती सरकार राज्यात पुन्हा स्थापन झाल्यास या योजनेअंतर्गत १ ५ ० ० रुपये ऐवजी २ १ ० ० रुपये महिना देऊ.
राज्यातील महिलांनी महायुती सरकारला मोठ्या प्रमाणात मतदानाच्या स्वरूपात मदत केली व राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकार स्थापन झाले त्यानंतर लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी १ ४ ० ० कोटी रुपयांची तरतूद केली आणि डिसेंबर महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले.
परंतु महायुती सरकारने जे आश्वासन दिले होते की राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकार स्थापन झाल्यास योजनेअंतर्गत २ १ ० ० रुपये महिना देऊ परंतु सरकारने डिसेंबर महिन्यामध्ये फक्त १ ५ ० ० रुपये महिलांच्या खात्यात जमा केले त्यामुळे महिलांचे या योजनेच्या 2100 रुपयाच्या हप्त्याकडे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र शासनाने जारी केले नवीन GR ?
सध्या लाडकी बहीण योजनेची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांना महाराष्ट्र सरकार आता वगळणार आहे आणि त्यांना या योजनेचा पुढील हप्ता मिळणार नाही यासंदर्भात माहिती मिळाली असता राज्याचे मंत्री अदिती तटकरी यांनी माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या एखाद्या महिलांच्या नावे योजनेच्या निकषांमध्ये बसत नाही अशी तक्रार आल्यास त्या महिलांच्या अर्जाची पुन्हा पडताळणी केली जाणार जर ती महिला या योजनेसाठी पात्र नसेल तर त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
हे पण वाचा : ७ व्या हप्त्याची मंजूर यादी जाहीर, लगेच चेक करा आपले नाव
त्याचप्रमाणे त्या म्हणाल्या लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांची सरसकट पडताळणी होणार नाही व तसेच सरकारने यासंदर्भात कुठला जीआर काढलेला नाही फक्त ज्या महिलांची तक्रार येणार त्या महिलांच्याच अर्जाची पडताळणी केली जाणार त्यामुळे जे सुरुवातीला नियमावली जाहीर केली होती त्यास नियमावलीप्रमाणे सरकार कारवाई करणार.
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .
1 thought on “Ladki Bahin Yojana New GR 2025 : महाराष्ट्र शासनाने जारी केले नवीन GR, आता ह्या महिलावर होणार कारवाई”