Ladki Bahin Yojana New Website Launch News In Marathi : महाराष्ट्र राज्यातील लोकप्रिय योजना ज्या योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेला राज्यभरातील महिलांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसत आहे महाराष्ट्र सरकारने 28 जून 2024 रोजी या योजनेची घोषणा केली आणि जुलै महिन्यापासून या योजनेची अर्ज प्रक्रिया सुरू झाली व 15 ऑक्टोबर 2024 या कालावधीमध्ये सरकारकडे 2.5 कोटीपेक्षा अधिक महिलांनी ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज केले त्यामधील 2 कोटी 34 लाख महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आला.
परंतु अशा अनेक महिला आहेत ज्यांचे अर्ज मंजूर असताना सुद्धा त्यांना या योजनेचा एकही हप्ता मिळाला नाही अशा महिलांसाठी आता आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र सरकारने या योजनेसंदर्भात पुन्हा एक अधिकृत वेबसाईट लॉन्च केलेली आहे त्या वेबसाईटचे माध्यमातून तुम्ही तुमच्या अर्जासंदर्भातची संपूर्ण माहिती प्राप्त करू शकता चला तर पाहूया या वेबसाईट संदर्भात संपूर्ण माहिती.
लाडकी बहीण योजनेच्या नवीन वेबसाईटचे वैशिष्ट्ये
महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची नवीन वेबसाईट लॉन्च केली आहे या वेबसाईटच्या माध्यमातून महिला आपल्या अर्जासंदर्भात माहिती प्राप्त करू शकतात या वेबसाईटमुळे महिलांना चांगला फायदा होणार आहे महिला आपल्या अर्जाची स्थिती व इन्स्टॉलमेंट स्थिती सोप्या पद्धतीने पाहू शकता.
लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची स्थिती अशा प्रकारे तपासा
लाडकी बहीण योजनेसाठी लाखो महिला पात्र आहे परंतु त्यांना या योजनेचा एकही हप्ता मिळाला नाही अशा महिला या वेबसाईटच्या मदतीने हप्त्याची स्थिती तपासू शकतात त्याची माहिती खालील प्रमाणे आहे.
- सर्वात पहिले सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर ( https://testmmmlby.mahaitgov.in ) तुम्हाला जावे लागेल
- आता तुमच्यासमोर लाडकी बहीण योजनेचा होम पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला लॉगिन चे ऑप्शन दिसेल
- तुम्हाला तुमच्या अर्जाची व हप्त्याची स्थिती पहायची असल्यास Beneficiary Status यावर क्लिक करायचा आहे.
- आता तुमच्यासमोर Beneficiary Status पेज ओपन होणार
- आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करताना मोबाईल नंबर दिलेला असेल तो मोबाईल नंबर एंटर करायचा आहे त्यानंतर तुम्हाला Get Mobile OTP यावर क्लिक करायचा आहे.
- तुमच्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी येणार तो OTP टाकून व्हेरिफाय करून घ्यावे
- आता तुमच्यासमोर तुमच्या अर्जाची व हप्त्याची स्थिती दिसेल.
हे पण वाचा : उर्वरित महिलांना या दिवशी मिळणार सर्व पैसे, पहा संपूर्ण माहिती
महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजनेची नवीन वेबसाईट जे लॉन्च केलेली आहे ती सध्या व्यवस्थितपणे काम करत नाही आहे काही दिवसांमध्ये ही वेबसाईट व्यवस्थितपणे काम करेल आणि तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती व हप्त्याची स्थिती पाहू शकता.
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .