Ladki Bahin Yojana Online Form Link : महाराष्ट्र सरकार राज्यातील महिलांसाठी विविध उपक्रम व योजना राबवत असते त्याचप्रमाणे 28 जून 2024 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना पंधराशे रुपये दर महिन्याला देण्यात येणार आहे आतापर्यंत सरकारकडे या योजनेसाठी दोन कोटी पेक्षा अधिक ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज प्राप्त झाली आहे आणि त्यामधील लाखो महिलांना या योजनेचा सरकारने लाभ पण दिलेला आहे.
परंतु सरकारने आता या योजनेच्या अर्ज प्रक्रियेमध्ये मोठा बदल केलेला आहे सरकारने आता या योजनेची नवीन अर्ज प्रक्रिया सुरू केलेली आहे जर तुम्ही पण आतापर्यंत या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर केलेला आहे आणि तुम्हाला प्रश्न पडला की अर्ज कशा प्रकारे करायचा तर आज आपण या योजनेसाठी कशाप्रकारे सरकारच्या नवीन पद्धतीने अर्ज सादर करता येईल या संदर्भात संपूर्ण माहिती पुढे पाहणार आहोत.
Table of Contents
Ladki Bahin Yojana Online Form Link Overview
योजनेचे नाव | मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | 2024 |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब परिवारातील महिला |
आर्थिक मदत | 1500 रुपये प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑफलाइन /ऑनलाईन |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 30 सप्टेंबर 2024 |
Ladki Bahin Yojana Online Form Link | https://ladakibahin.maharashtra.gov.in |
हेल्पलाइन नंबर | 181 |
लाडकी बहीण योजनेचे उद्देश
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून सरकार आर्थिक दृष्ट्या व गरीब परिवारातील महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये देत आहे या आर्थिक मदतीचा वापर करून महिला आपल्या परिवाराचा सांभाळ करू शकतील आणि त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार नाही या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने ही योजना लागू केली आहे.
लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- बँक पासबुक ( बँक पासबुक आधार लिंक असणे अनिवार्य आहे )
- अधिवास प्रमाणपत्र ( अधिवास प्रमाणपत्र नसेल तर जन्म दाखला, शाळा सोडण्याचा दाखला, मतदान कार्ड यापैकी कोणते एक पंधरा वर्षे पूर्ण झालेले कागदपत्रे जोडावे )
- उत्पन्न प्रमाणपत्र ( उत्पन्नाचा दाखला नसेल तर – केसरी किंवा पिवळ्या रंगाचे राशन कार्ड )
- हमीपत्र
- पासपोर्ट साईज फोटो
- मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज फॉर्म
माझी लाडकी बहीण योजनेची पात्रता
- अर्जदार महिलाही महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे
- अर्जदार महिलाचे वय हे 21 ते 65 वयोगटातील असावे
- अर्जदार महिलाच्या एकत्रित कुटुंबाची वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे
- अर्जदार महिलेजवळ योजनेसाठी लागणारे सर्व कागदपत्रे असणेआवश्यक आहे
लाडकी बहीण योजनेच्या अर्ज प्रक्रियेच्या कालावधीत वाढ
महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांसाठी एक मोठा निर्णय घेतलेला आहे राज्यातील कोणती महिला या योजनेपासून वंचित राहू नये त्यांना योजनेचा लाभ मिळावा या उद्देशाने सरकारने योजनेची शेवटची तारीख वाढवण्यात आलेली आहे सुरुवातीला या योजनेची अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 ठेवण्यात आलेली होती
परंतु या सर्व बाबीवर लक्ष देत सरकारने आता 30 सप्टेंबर 2024 शेवटची तारीख ठेवलेली आहे
लाडकी बहीण योजनेच्या अर्ज प्रक्रियेमध्ये बदल
महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अर्ज प्रक्रियेमध्ये मोठा बदल केलेला आहे सुरुवातीला या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील महिलांना अनेक पर्याय उपलब्ध होते महिला स्वतः किंवा सेतू केंद्रामध्ये जाऊन या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकत होत्या
परंतु सरकारने उर्वरित महिलांची आकडेवारी पाहता व त्याचप्रमाणे या योजनेसोबत मागील सातारा जिल्ह्यामध्ये झालेल्या गैर प्रकरणासंदर्भात मोठा निर्णय घेतलेला आहे आणि आता फक्त अंगणवाडी केंद्र मार्फत अर्ज स्वीकारले जातील अशी माहिती सरकारकडून देण्यात आलेली आहे आणि याबाबत सरकारने शासन निर्णय पण काढलेला आहे.
लाडकी बहीण योजनेची नवीन Online अर्ज प्रक्रिया
- सर्वात पहिले तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर ( https://ladakibahin.maharashtra.gov.in ) जावे लागेल
- आता तुम्हाला अर्जदार लॉगिन या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे
- त्यानंतर तुमच्यासमोर Login पेज ओपन होईल जर तुम्ही लॉग इन आयडी पासवर्ड तयार केले असेल तर लॉगिन करून घ्यावे.
- लॉगिन केल्यानंतर Application of Mukhyamantri – Majhi Ladki Bahin Yojana या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे
- तुम्हाला अर्जदार महिलेचा आधार नंबर व कॅपच्या फील करून Validate Aadhar या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे
- आता तुमच्यासमोर योजनेचा Registration Form फॉर्म ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला तुमची व्यक्तिगत व पत्त्याची माहिती आणि त्याचप्रमाणे बँकेची माहिती द्यावी लागेल
- सर्व माहिती अचूक पद्धतीने भरल्यानंतर तुम्हाला आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील
- कागदपत्रे अपलोड झाल्यानंतर Accept Disclaimer of hamipatra ला चेक मार्क करून Submit या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे
- आता तुमच्यासमोर Preview Page ओपन होईल त्यामधील तुम्ही भरलेली माहिती पुन्हा एकदा चेक घ्या
- माहिती चेक केल्यानंतर कॅपच्या फील करून Submit या ऑप्शन वर क्लिक करून घ्यावे.
अशाप्रकारे तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकता परंतु जे मी तुम्हाला अर्ज प्रक्रिया सांगितलेली आहे ती अर्ज प्रक्रिया आता फक्त अंगणवाडी कर्मचारी महिला करू शकतात कारण सरकारने या योजनेसाठी अर्ज करण्याची परवानगी फक्त अंगणवाडी कर्मचारी महिलांना दिलेली आहे.
सर्वसाधारण महिलांनी असे करा अर्ज सादर
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा अर्ज जर तुम्ही सप्टेंबर महिन्यामध्ये करत असाल तर सरकारने अर्ज प्रक्रिया बदल केलेले आहेत तुम्हाला आता ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागेल त्याची प्रक्रिया खालील प्रमाणे आहे.
- सर्वात पहिले तुम्हाला या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे तयार करून घ्यायचे आहे
- त्यानंतर तुम्हाला या योजनेचा अर्ज फॉर्म अचूक पद्धतीने भरून करून घ्यायचा आहे
- मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज फॉर्म व्यवस्थित भरल्यानंतर त्यासोबत आवश्यक कागदपत्रे व हमीपत्र जोडून घ्यावे
- आता तुम्हाला तुमच्या जवळच्या अंगणवाडी केंद्रामध्ये भेट द्यायची आहे
- अंगणवाडी केंद्रांमधील कर्मचारी महिलाशी संपर्क करून तो अर्ज त्यांच्याजवळ जमा करायचा आहे
- अंगणवाडी कर्मचारी महिलांकडून तुमचा अर्ज ऑनलाईन केला जाणार व तसेच त्यांच्याकडून मंजूर पण केला जाणार.
अशा प्रकारे तुम्ही शासनाच्या नवीन नियमानुसार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करू शकता.
Ladki Bahini Yojana Important Link
Ladki Bahini Yojana Online Apply Link | Click Here |
Ladki Bahin Online Aadhar Link | Click Here |
Ladki Bahin Aadhar Link Check | Click Here |
Ladki Bahin Yojana Approved List | Click Here |
Ladki Bahin Yojana Balance Check | Click Here |
FAQ- Ladki Bahin Yojana Online Form Link
लाडकी बहीण योजनेचा तिसरा टप्पा कधी जमा होणार आहे ?
लाडकी भाई योजना चा तिसरा टप्पा 14 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर या कालावधीमध्ये पात्र महिलांच्या खात्यात जमा होईल
लाडकी बहीण योजनेसाठी नवीन अर्ज सादर कसा करावा ?
लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला जवळच्या अंगणवाडी केंद्रामध्ये भेट देऊन अर्ज सादर करावा लागेल
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .
3 thoughts on “Ladki Bahin Yojana Online Form Link : लाडकी बहीण योजनेची नवीन अर्ज प्रक्रिया, अशा प्रकारे करा Online अर्ज सादर फक्त 5 मिनिटात, पहा संपूर्ण माहिती”