Ladki Bahin Yojana Payment Status : अर्ज मंजूर पण जमा झाला नाही एकही हप्ता ? लगेच करा या 7 गोष्टी तात्काळ जमा होतील पैसे

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ladki Bahin Yojana Payment Status News In Marathi : महाराष्ट्र सरकारने राज्यातील आर्थिक दृष्ट्या व गरीब परिवारातील महिलांना आर्थिक बळ देण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेचा लाभ घेऊन महिला आपल्या परिवाराचा सांभाळ करू शकल व त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू नये या उद्देशाने हि योजना सरकारने लागू केली आहे या योजनेच्या माध्यमातून महिलांना तर महिन्याला पंधराशे रुपये दिले जात आहे आतापर्यंत सरकारने या योजनेअंतर्गत पाच हप्त्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा केलेले आहेत.

परंतु अशा अनेक महिला आहेत ज्याचे अर्ज मंजूर तर झाले आहे परंतु त्यांना या योजनेचा एकही हप्ता मिळाला नाही तर आज आपण या संदर्भात ७ गोष्टी पाहणार आहोत ती पूर्ण केल्यानंतर ह्या योजनेचे पैसे महिलांना मिळण्यास मदत होईल तर चला तर पाहूया या संदर्भात संपूर्ण माहिती

बँक खाते आधार लिंक आहे हे तपासून घ्या

जर तुम्ही या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केले असेल आणि तुमचा अर्ज मंजूर असेल परंतु तुमचे बँक खाते जर आधार लिंक नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही कारण या योजनेचा पैसा फक्त आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा केला जात आहे त्यासाठी तुम्हाला ज्या बँकेच खात आहे त्या बँकेत जावे लागेल आणि तुमचे बँक खाते आधार लिंक आहे का नाही हे तपासून घ्यावे जर बँक खाते आधार लिंक नसेल तुम्हाला बँक आधार लिंक करावे लागेल.

हे पण वाचा : आधार लिंक खाते चेक करा फक्त 2 मिनिटात, लगेच जमा होतील पैसे

अर्जात चुकीची माहिती भरली आहे का ? हे तपासून घ्या

अनेक महिलांनी स्वतः किंवा सेतू केंद्र मार्फत तसेच अंगणवाडी केंद्र मार्फत ऑनलाइन अर्ज सादर केले आहे परंतु अर्ज भरताना काही चुका झाल्या असेल तरीही या योजनेचा पैसा महिलांच्या खात्यात जमा होणार नाही त्यासाठी तुम्हाला तुमच्या अर्जाची परत तपासणी करावी लागेल जर तुम्ही अर्ज सेतू केंद्रात किंवा अंगणवाडी केंद्रात भरला असेल तर तुम्ही त्या केंद्रात भेट देऊन या संदर्भात माहिती प्राप्त करू शकता.

जर तुमच्या अर्जात काही चुका झाले आहेत त्यासाठी तुम्हाला तालुकास्तरीय महिला व बालविकास विभागांमध्ये भेट द्यावी लागेल व त्यांच्यामार्फत तुमच्या अर्जाची त्रुटी दुरुस्त करण्याची प्रक्रिया केली जाईल.

योजनेचे निकष पूर्ण केले आहेत का ?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनेक महिलांनी अर्ज सादर केले व तालुकास्तरीय समिती मार्फत त्यांचे अर्ज मंजूर झाले परंतु त्यांना या योजनेचा एक हप्ता मिळाला नाही या संदर्भात माहिती मिळाली असता अनेक महिला या योजनेचे निकष पूर्ण करत नसल्यामुळे या योजनेचा लाभ त्यांना मिळालेला नाही करिता महिलांनी आपली निकषांची पडताळणी करून घ्यावी.

Ladki Bahin Yojana Payment Status
Ladki Bahin Yojana Payment Status

तुमचे बँक खाते निष्क्रिय आहे का हे तपासून घ्या ?

अनेक पात्र महिलांनी या योजनेसाठी जे खाते दिलेले होते ते खाते निष्क्रिय असल्याची माहिती समोर येते आहे त्यासाठी महिलांनी आपल्या बँक शाखा मध्ये जाऊन आपली खाते चालू करून घ्यावे व तसेच ते खाते आधार लिंक पण करून घ्यावे त्यानंतर या योजनेचा पैसा त्यांना मिळण्यास मदत होईल.

एकापेक्षा अधिक बँक खाते आहे का हे तपासून घ्या

अनेक महिलांनी अर्ज करताना जे बँक पासबुक दिले होते तर त्या खात्यामध्ये योजनेचे पैसे जमा झाले नाही या संदर्भात माहिती मिळाली असता काही महिलांचे एकापेक्षा अधिक बँक खाते आहे जे बँक पासबुक महिलांनी अर्ज करताना दिले होते ते आधार लिंक नसल्यामुळे त्यांचे पैसे इतर बँकेच्या आधार लिंक खात्यात जमा झाले आहे त्यासाठी महिलांनी आपले इतर बँकचे खाते असल्यास ते तपासून घ्यावे.

तुम्ही तुमची तक्रार येथे नोंदवू शकता

तुमचा अर्ज मंजूर आहे व तसेच बँक खाते आधार लिंक पण आहे परंतु तुम्हाला या योजनेचा एकही हप्ता मिळाला नाही त्यासाठी तुम्ही सरकारच्या अधिकृत 181 हेल्पलाइन नंबर ला कॉल करून तक्रार नोंदवू शकता व त्याचप्रमाणे तुम्ही जवळच्या महिला व बालविकास विभागांमध्ये भेट देऊन तक्रार देऊ शकता त्याकरिता तुम्हाला अर्जामध्ये सादर केलेले सर्व कागदपत्रे सोबत घेऊन जावे लागेल.

निष्कर्ष

जर तुमचा पण अर्ज मंजूर आहे व बँक खाते आधार लिंक आहे तरी तुम्हाला या योजनेचा पैसा मिळाला नाही आणि तुम्ही या योजनेच्या नियमांमध्ये बसत आहात तर तुम्हाला पुन्हा काही दिवसाची वाट पहावी लागेल सरकारकडून काही दिवसांमध्ये या योजनेचा सहावा हप्ता जमा केला जाणार आहे तर त्यामध्ये तुम्हाला पण या योजनेचे उर्वरित सर्व हप्त्याचे पैसे मिळू शकते.

1 thought on “Ladki Bahin Yojana Payment Status : अर्ज मंजूर पण जमा झाला नाही एकही हप्ता ? लगेच करा या 7 गोष्टी तात्काळ जमा होतील पैसे”

Leave a Comment