Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 : राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्यात आली आहे, नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी त्याचबरोबर आवश्यक साहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्याकरिता ही योजना महाराष्ट्र राज्यभर राबवली जात आहे, तर आज आपण या योजनेसंदर्भात अर्ज प्रक्रिया पासून ते लाभ मिळण्यापर्यंत संपूर्ण माहिती पाहणार आहोत .
Table of Contents
Mukhyamantri Vayoshri Yojana Overview
योजनेचे नाव | मुख्यमंत्री वयोश्री योजना |
राज्य | महाराष्ट्र |
योजनेचे लाभार्थी | 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिक |
अर्ज प्रक्रिया | ऑफलाइन /ऑनलाईन |
आर्थिक मदत | 3000 रुपये |
Vayoshri Yojana Online Apply Link | Available Soon |
Mukhyamantri Vayoshri Yojana Eligibility
- अर्जदार लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक
- अर्जदार लाभार्थी यांची वय कमीत कमी 65 वर्ष पूर्ण असावे
- अर्जदार लाभार्थीं यांच्या परिवाराचे उत्पन्न 2 लाखापेक्षा जास्त नसावे
- अर्जदार लाभार्थी मागील तीन वर्षे स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रम सहित कोणत्याहि सरकारी योजनेतून उपकरण विनामूल्य प्राप्त केलेला नसावा
- बँक पासबुक आधार लिंक असणे आवश्यक
मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- मतदान कार्ड
- बँकेचे पासबुक
- दोन पासपोर्ट साईज फोटो
- स्वघोषणापत्र
शासनाचे नियमानुसार वरील दिलेल्या कागदपत्रात सोबत अन्य कागदपत्राची आवश्यकता लागू शकते.
मुख्यमंत्री वयोश्री योजनेची लाभ व वैशिष्ट्ये
सदर योजनेअंतर्गत पात्र वृद्ध लाभार्थ्यांना शारीरिक असमर्थतता व सहाय्यभूत साधने/उपकरणे खरेदी करता राज्य सरकारकडून डीबीटी च्या मध्यमाने थेट लाभार्थी यांच्या खात्यात 3000 हजार रुपये वितरित केली जाणारआहे , या पैशाचा वापर करून वृद्ध लाभार्थी खालील उपकरणे व साधने घेऊ शकतात.
- चष्मा
- श्रवियांत्र
- रायपॉड, स्थटक वहील चेअर
- फोल्ल्डग वॉकर
- कमोड खुची
- रन-ब्रेस
- लांबर बेल्ट
- सवाइकल कॉलर इ.
मुख्यमंत्री वयोश्री योजनाअर्ज प्रक्रिया
ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी जवळच्या तहसील कार्यालय/ समाज कल्याण विभागामध्ये भेट द्यावी लागेल आणि त्यांना ऑफलाइन पद्धतीने आपला अर्ज सादर करावा लागेल , या योजनेच्या अधिक माहितीसाठी आम्ही तुम्हाला खाली जीआर ची लिंक दिलेली आहे ती आपण वाचू शकता.
मुख्यमंत्री वयोश्री योजना GR PDF
File Name | Mukhyamantri Vayoshri Yojana GR pdf |
Size | 100kb |
Download Link | Click here |
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .