Ladki Bahin Yojana Approved List : राज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे, या योजनेला सध्या महाराष्ट्रभरातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसत आहे या योजनेचा पहिला हप्ता 31 जुलै 2024 पर्यंत अर्ज करणाऱ्या पात्र महिलांना मिळालेला आहे.
महाराष्ट्र सरकारने सुरुवातीला नारीशक्ती दूत ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केली होती परंतु काही कारणास्तव नारीशक्ती दूत ॲपच्या माध्यमातून अर्ज प्रक्रिया बंद करून अधिकृत वेबसाईटने अर्ज प्रक्रिया 1 ऑगस्ट 2024 पासून सुरू केली आहे आणि वेबसाईटच्या माध्यमातून लाखो महिलांनी अर्ज सादर केले आहेत.
परंतु वेबसाईटचे माध्यमातून लाखो महिलांनी ऑनलाइन अर्ज सादर केला आहे व त्या महिला वाट पाहत आहे की आमचे अर्ज कधी मंजूर होणार आणि कधी आम्हाला या योजनेचा पैसा मिळणार तर या संदर्भात आम्ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आलोय की तुमचा अर्ज मंजूर झालाय का नाही ते कशाप्रकारे पाहायचे आणि तुम्हाला पैसा कधी मिळणार याबाबत संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला पुढे देणार आहोत.
Table of Contents
Ladki Bahin Yojana Approved List Overview
योजनेचे नाव | मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना |
योजनेची सुरुवात | 28 जून 2024 |
राज्य | महाराष्ट्र |
योजनेची घोषणा | महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून या योजनेची घोषणा करण्यात आली |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील महिला |
आर्थिक मदत | 1500 रुपये प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन/ऑफलाइन |
अधिकृत वेबसाईट | https://ladakibahin.maharashtra.gov.in |
Ladki Bahin Yojana Online Apply Link | Click Here |
हेल्पलाइन नंबर | 181 |
Ladki Bahin Yojana Maharashtra
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना हे महाराष्ट्र राज्याची एक महत्वकांक्षी योजना आहे या योजनेचे माध्यमातून आर्थिक दृष्ट्या व गरीब परिवारातील महिलांना राज्य सरकार दर महिन्याला 1500 रुपये देणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे व तसेच महिलाची वय 21 ते 65 वयोगटातील असणे अत्यंत आवश्यक आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना योजनेच्या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाइन सादर करू शकतात.
Ladki Bahin Yojana 2nd Installment
महाराष्ट्र सरकारने या योजनेचा पहिला हप्ता पात्र महिलांच्या खात्यामध्ये 14 ऑगस्ट पासून ते 17 ऑगस्ट पर्यंत त्यांच्या खात्यामध्ये जमा केले आहे परंतु ज्या महिलांनी वेबसाईटचे माध्यमातून अर्ज सादर केलेला आहे अशा सर्व महिला वाट पाहत आहे की आम्हाला योजनेचा हप्ता कधी मिळणार यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार या उर्वरित महिलांना योजनेचा हप्ता सप्टेंबर महिन्यामध्ये त्याच्या आधार लिंक खात्यामध्ये जमा होईल.
Ladki Bahin Yojana Approved List
महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी वेबसाईट मार्फत केलेले अर्ज पूर्ण क्षमतेने मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे जर तुम्ही पण या योजनेसाठी वेबसाईटचे मार्फत ऑनलाईन अर्ज सादर केलेला आहे आणि तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती पाहायची आहे तर तुम्हाला काही स्टेप खाली दिलेली आहेत त्यांना फॉलो करून तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती पाहू शकता.
- सर्वात पहिले तुम्हाला योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर https://ladakibahin.maharashtra.gov.in जावे लागेल
- त्यामध्ये तुम्हाला अर्जदार लॉगिन या ऑप्शन वर क्लिक करून लॉगिन करून घ्यायचा आहे
- लॉगिन झाल्यानंतर Applications Made Earlier या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे
- आता तुमच्यासमोर तुम्ही केलेले अर्ज दिसतील त्यामध्ये तुम्हाला Applcation Status मध्ये PENDING असे दिसत असल्या तुमचा अर्ज पडताळणी करणे बाकी आहे
- त्याचप्रमाणे जर तुम्हाला तुमच्या अर्जाच्या स्थितीमध्ये RE-SUMBIT असे दिसत असल्यास तुमचा अर्ज त्रुटी संदर्भात रद्द केला गेला आहे ( त्रुटी दुरुस्त करून तुम्हाला तो अर्ज परत एकदा सादर करावे लागेल )=
- आणि जर तुम्हाला तुमच्या अर्जाच्या स्थितीमध्ये APPROVED असे दिसत असल्यास तुमचा अर्ज मंजूर करण्यात आलेला आहे
तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे अर्ज मंजूर झाले का नाही हे पाहू शकता जर तुमच्या अर्ज APPROVED झालेले आहे तर तुम्हाला पुढील महिन्यांमध्ये 4500 रुपये तीन महिन्याची मिळून तुमच्या खात्यामध्ये जमा होतील
Ladki Bahin Yojana Important Link
Ladki Bahin Yojana 2nd Installment List | Click Here |
Ladki Bahin Online Aadhar Link | Click Here |
Ladki Bahin Online Aadhar Link Check | Click Here |
Ladki Bahini Yojana Online Apply Link | Click Here |
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .
13 thoughts on “Ladki Bahin Yojana Approved List : लाखो महिलांचे अर्ज मंजूर, नवीन यादी जाहीर, या दिवशी जमा होणार, पैसे लगेच चेक करा तुमचे नाव”