Majhi Ladki Bahin Yojana News in Marathi : महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत लाखो महिलांना आतापर्यंत जुलै आणि ऑगस्ट महिन्याची मिळून तीन हजार रुपये देण्यात आलेले आहेत, राज्यामध्ये मागील झालेल्या सातारा जिल्ह्यातील एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या नावे तब्बल 30 ऑनलाईन अर्ज सादर केले होते आणि त्यामधील 26 अर्ज हे मंजूर होऊन त्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले होते सरकार योजनेमध्ये नवीन नवीन बदल करत आहे
अशा प्रकारे महिला आहेत ज्या शासनाच्या पात्रतेमध्ये बसत नाहीत परंतु त्यांनी ऑनलाइन अर्ज सादर केलेले आहे आणि त्यांचे अर्ज पण मंजूर झालेले आहे आणि त्यांना या योजनेचा पैसा पण मिळालेला आहे यासंदर्भात सरकारकडून अपात्र अर्जाची तपासणी करणे लवकरच सुरू करण्यात येणार .
आणि जर महिला शासनाच्या नियमाचे पालन करता या योजनेचा लाभ घेत असल्यास अशा महिला कडून हे पैसे परत घेतले जाणार आहे तर कोणकोणत्या महिला कडून पैसे परत घेतले जाणार आहे आणि त्यांचे कारण काय आहे संपूर्ण माहिती आपण पुढे पाहूया.
लाडकी बहीण योजनेसाठी पात्रता
- राज्यातील विधवा, विवाहित, अविवाहित, घटस्फोटीत, निराधार महिला या योजनेसाठी पात्र असतील
- अर्जदार महिलेचे वय 21 ते 65 वयोगटातील असणे आवश्यक आहे
- अर्जदार महिलाही महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे अनिवार्य
- अर्जदार महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे
लाडकी बहीण योजनेसाठी अपात्रता
- अर्जदार महिलेचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असल्यास तीन महिला या योजनेसाठी अपात्र ठरणार
- अर्जदार महिलाच्या कुटुंबातील सदस्य आयकर दाता असल्यास ती महिला या योजनेसाठी अपात्र ठरणार
- महिला जर इतर राज्यातील असेल अशा संदर्भात महिला या योजनेसाठी अपात्र ठरणार
- शासनाच्या इतर योजनेमार्फत 1500 पेक्षा जास्त आर्थिक मदत घेत असल्यास अशा पण महिला या योजनेसाठी अपात्र ठरतील
लाडकी बहीण योजनेच्या अपात्रता नियम खूप आहेत परंतु मी तुम्हाला काही थोडक्यात नियम सांगितले जे सर्वसामान्य महिलांसाठी लागू होतात जर तुम्हाला सर्व नियम पाहायचे असल्यास तुम्ही या लिंक वर क्लिक करून पाहू शकतात.
लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेतले जातील ?
महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी काही पात्रता नियमावली ठरवलेली आहे परंतु अनेक महिलांनी या नियमाचा उल्लंघन करून या योजनेसाठी ऑनलाईन सादर केले आहे आणि त्यांना या योजनेचा लाभ पण मिळत आहे अशा सर्व महिलावर शासन लवकरच कारवाई करणार आहे
मिळालेल्या माहितीनुसार अनेक महिला शासनाच्या इतर योजनेमार्फत त्यांना पंधराशे रुपये पेक्षा जास्त आर्थिक लाभ घेत आहे व त्याचप्रमाणे अनेक महिला शासनाच्या पात्रता नियमांमध्ये बसत नाही अशा सर्व महिला कडून त्यांच्या खात्यात जमा झालेले पैसे त्यांना परत करावे लागतील या संदर्भात माहिती मिळत आहे.
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .