Majhi Ladki Bahin 3rd Installment Update In Marathi : महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेला राज्यभरातून मोठ्या प्रमाणात महिलांचा प्रतिसाद मिळताना दिसत आहे आतापर्यंत या योजनेसाठी ऑनलाईन व ऑफलाइन अर्ज दोन कोटी पेक्षा अधिक सरकारकडे प्राप्त झाले आहे त्यामधील एक कोटी पेक्षा अधिक अर्जाची पडताळणी करून महिलांना लाभ देण्यात आलेला आहे.
परंतु अशा अनेक महिला आहेत ज्यांचे अर्ज मंजूर झालेले आहे परंतु त्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारने काही निर्देश दिलेले आहेत त्याची माहिती आपण पुढे सविस्तर पाहूया.
Table of Contents
Majhi Ladki Bahin 3rd Installment Update Overview
योजनेचे नाव | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना |
अंमलबजावणी | 28 जून 2024 |
राज्य | महाराष्ट्र |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या व गरीब परिवारातील महिला |
आर्थिक मदत | 1500 प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन/ऑफलाइन |
अधिकृत वेबसाईट | https://ladakibahin.maharashtra.gov.in/ |
हेल्पलाइन नंबर | 181 |
योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात जमा
महाराष्ट्र सरकारने 25 सप्टेंबर 2024 पासून ते 30 सप्टेंबर 2024 पर्यंत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा केलेला आहे अनेक महिलांना तीन महिन्याची मिळून साडेचार हजार रुपये त्यांच्या बँकेत जमा झालेले आहे त्याचप्रमाणे ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याची मिळून तीन हजार रुपये ऑगस्ट महिन्यात प्राप्त झाले होते अशा सर्व महिलांना दीड हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा झालेले आहे.
योजनेचे अर्ज मंजूर पण पैसे आले नाहीत
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी महाराष्ट्रभरातून मोठ्या प्रमाणात महिलांनी लाभ घेण्यासाठी अर्ज केलेले आहे त्यामधील अनेक महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे परंतु अनेक महिलांचे अर्ज मंजूर असून सुद्धा त्यांना या योजनेचा लाभ मिळाले नाही त्यामुळे महिलांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहे कि अर्ज मंजूर असताना सुद्धा पैसे जमा का झाले नाही.
या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज केली होते आणि त्यांचे अर्ज मंजूर झाले होते अशा सर्व महिलांना ऑक्टोबर महिन्यात या योजनेचा लाभ दिला जाणार आहे त्याचप्रमाणे अनेक महिलांची खाते आधार लिंक नसल्यामुळे त्यांना या योजनेचे लाभ मिळाले नाही.
अर्ज मंजूर पण पैसे आले नाहीत, तर हे करा काम
अनेक महिलांचे अर्ज मंजूर पण पैसे आले नाहीत तर यासंदर्भात सरकारने महिलांसाठी निर्देश दिलेले आहेत त्याची माहिती खालील प्रमाणे आहे.
- सर्वात आधी तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का हे तपासून घ्यावे
- तुमचे आधार कार्ड एकापेक्षा अधिक बँक खात्याशी लिंक असल्यास इतर बँ तुमच्याक खात्या मध्ये पैसे आले का हे तपासून घ्यावे
- तुमच्या कोणत्याही बँक अकाउंट ला आधार लिंक नसल्यास तात्काळ आधार लिंक करून घ्यावे त्यानंतर तुमच्या खात्यात पैसे जमा होतील.
Ladki Bahin Yojana Important Link
Ladki Bahin Yojana Online Aadhar Link | Click Here |
Ladki Bahin Aadhar Link Check | Click Here |
Ladki Bahin Yojana Balance Check | Click Here |
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .
सिंधू साहेबराव पाटिल. लाडकी बहिण योजनेचे कोणताही हप्ता आज पर्यत मिळालेला नाही. आर्ज अप्प्रोड़ आहे. आधार लिंक आहे. त्याच प्रमाणे बैंक सीडिंग औक आहे.