Ladki Bahin 6th Eligible List News In Marathi : महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता योजनेमध्ये महाराष्ट्र सरकारकडून मोठा बदल केला जाणार आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना 1500 रुपये प्रति महिना आर्थिक मदत केली जात आहे आतापर्यंत सरकारकडून साडेसात हजार रुपये महिलांना देण्यात आलेले आहे या योजनेला महिलांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळालेला आहे आणि याचा फायदा महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात झालेला आहे.
अशातच महिलांसाठी आता सोन्याचे दिवस येणार आहे कारण महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यात वाढ केली जाणार आहे परंतु ही वाढीव रक्कम महिलांना कधीपर्यंत मिळणार आहे आणि या वाढीव रकमेच्या पात्र महिला कोणत्या या संदर्भात आज आपण सविस्तर पुढे पाहणार आहोत.
लाडकी बहीण योजनेमध्ये होणार मोठा बदल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सुरू असलेले मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये आता लवकरच मोठा बदल होणार आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक विधानसभा च्या प्रचार सभेत महिलांना आश्वासन दिले होते की राज्यामध्ये पुन्हा महायुती सरकार आल्यास मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यात वाढ करून 2100 रुपये केली जाईल,
अशातच महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणूक निकाल समोर आला आणि लवकरच राज्यांमध्ये महायुतीचे सरकार स्थापन होणार आहे आणि आता महिलांना या योजनेच्या सहाव्या हप्त्यामध्ये 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये दिले जाणार आहे.
हे पण वाचा : लाडक्या बहिणीसाठी सरकारने घेतला मोठा निर्णय, पहा संपूर्ण माहिती
लाडकी बहीण योजनेचा हप्ता या दिवशी होणार जमा
महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेचे पाच हप्त्याचे पैसे आतापर्यंत महिलांच्या खात्यात जमा केलेले आहेत परंतु महिला आता या योजनेच्या सहाव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे अशातच महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र सरकारकडून 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत या योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा केले जाणार आहे.
2100 रुपयाची नवीन पात्र यादी जाहीर
महाराष्ट्र सरकार कडून लाडकी बहीण योजनेच्या सहाव्या हप्त्यामध्ये वाढ केली जाणार आहे आता महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2100 रुपये दर महिन्याला आर्थिक लाभ दिला जाणार आहे परंतु कोणत्या महिलांना 2100 रुपये हप्ता मिळणार आहे या संदर्भात माहिती मिळाली असता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र महिलांना डिसेंबर महिन्यापासून 2100 रुपये हप्ता मिळणार आहे.
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .