Ladki Bahin 6th Hapta Update : लाडक्या बहिणीचा सहावा हप्ता लांबणीवर, आता या दिवशी जमा होणार 2100 रुपये

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ladki Bahin 6th Hapta Update News In Marathi : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरीब परिवारातील महिलांना पंधराशे रुपये प्रति महिना देण्यात येत आहे आतापर्यंत सरकारने या योजनेअंतर्गत एकूण पाच हप्त्याचे पैसे साडेसात हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा केलेले आहेत आणि आता महिला या योजनेच्या सहाव्या त्याच्या प्रतीक्षेमध्ये आहे

परंतु लाडक्या बहिणीचा सहावा हप्ता लांबणीवर गेलेला आहे आता महिलांना पुन्हा काही दिवसाची वाट पाहावी लागेल तर महिलांना कधीपर्यंत योजनेचा सहावा हप्ता मिळणार या संदर्भात संपूर्ण माहिती आपण पुढे सविस्तर पाहणार आहोत.

महायुती सरकारची शपथविधी तारीख घोषित

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजनेच्या आशीर्वादाने महायुती सरकारला मोठ्या प्रमाणात बहुमत मिळालेले आहे परंतु डिसेंबर महिना सुरू झाला अद्याप राज्यांमध्ये सरकार स्थापन झालेले नाही अशातच महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोशल मीडियाद्वारे शपथविधी संदर्भात माहिती देत ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आझाद मैदानावर 5 डिसेंबर 2024 ला संध्याकाळी पाच वाजता शपथ ग्रहण सोहळा संपन्न होणार आहे त्यामुळे पाच डिसेंबरला राज्यात महायुतीची सत्ता स्थापन होणार आहे.

डिसेंबर पासून महिलांना मिळणार 2100 रुपये

राज्यामध्ये काही दिवसात महायुती सरकार स्थापन होणार आहे आणि महायुती सरकारने प्रचार सभेमध्ये दिलेला शब्द पूर्ण करणार आहे त्यांनी वचनामध्ये जाहीर केली होती की लाडक्या बहिणीचा जर आशीर्वाद महायुती सरकारला मिळाला आणि महायुती सरकार पुन्हा राज्यात स्थापन झाली तर महिलांना लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये देऊ आणि महिलांच्या आशीर्वादाने राज्यात महायुती सरकार आलेले आहे आता महिलांना या योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्यापासून 2100 रुपये महिना मिळणार आहे.

हे पण वाचा : आचारसंहिता संपली , लाडक्या बहिणींनो आजच करा हे काम, नाही तर मिळणार नाही पैसे

Ladki Bahin 6th Hapta Update
Ladki Bahin 6th Hapta Update

लाडक्या बहिणीचा सहावा हप्ता लांबणीवर

महाराष्ट्र सरकारने अवघ्या काही महिन्यांमध्ये ही योजना राबवून महिलांना 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत पाच हप्त्याचे पैसे दिलेले आहे आणि आता सरकार या योजनेचा सहावा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यात जमा करणार आहे परंतु राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही प्रचार सभेमध्ये महिलांना आश्वासन दिले होते की राज्यात जर नोव्हेंबर महिन्यामध्ये आमचे सरकार स्थापन झाले तर महिलांना नोव्हेंबर महिन्यामध्येच सहाव्या हाताचे पैसे दिले जाईल परंतु आत्तापर्यंत राज्यात सरकार स्थापन झाले नाही.

परंतु महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोशल मीडियाद्वारे शपथविधी संदर्भात माहिती दिली व त्यांनी सांगितले की पाच डिसेंबर 2024 रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे त्यामुळे महिलांच्या खात्यात पाच डिसेंबर नंतर पैसे जमा होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment