Ladki Bahin Yojana News In Marathi : राज्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेच्या मदतीने गरीब परिवारातील महिलांना पंधराशे रुपये महिना आर्थिक मदत दिली जात आहे या आर्थिक मदतीने महिला आपल्या परिवाराचा सांभाळ करू शकतील आणि त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये याकरिता महाराष्ट्र सरकारने ही योजना लागू केली आहे या योजनेअंतर्गत आतापर्यंत सरकारने 2 कोटी 34 लाख पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा केलेले आहेत
आता महिला या योजनेच्या सहाव्या हप्त्याची वाट पाहत आहे तर आज आपण डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होणार व त्याचप्रमाणे महिलांना डिसेंबर महिन्यात किती पैसे मिळणार या संदर्भात संपूर्ण माहिती पुढील पाहूया.
Table of Contents
डिसेंबर महिन्याचा हप्ता महिलांना किती मिळणार
राज्यातील महिलांना महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीदरम्यान आश्वासन दिली होती की राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आल्यास राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये देऊ आणि लाडकी बहीण योजनांच्या मदतीने राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकार स्थापन झालेली आहे.
राज्याला नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मिळाली आहेत आणि महिलांना आता या योजनेअंतर्गत 2100 रुपये देण्यात येणार आहे परंतु राज्य सरकारकडून महिलांना या योजनेअंतर्गत 2100 रुपये कधीपासून मिळणार आहे हे अजून सरकार कडून जाहीर करण्यात आलेले नाही त्यामुळे महिलांना सरकारच्या निर्णयाची अजून काही दिवस वाट पाहावी लागेल.
डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार
महाराष्ट्र राज्यातील महिला आता या योजनेच्या सहाव्या हप्त्याची वाट पाहत आहे मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होणार होते मात्र सत्ता स्थापनेसाठी उशीर झाल्या कारणामुळे या योजनेचा सहावा हप्ता रखडलेला आहे आशातच महिलांसाठी आता आनंदाची बातमी समोर येत आहे या योजनेत पैसे 15 डिसेंबर 2024 पर्यंत महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
लाडक्या बहिणीच्या अर्जाची पुन्हा पडताळणी होणार ?
लाडकी बहीण योजनेच्या मंजूर अर्जाची पुन्हा पडताळणी केली जाणार अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे जर असा निर्णय सरकारने घेतला तर लाखो महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहू शकतात तर या संदर्भात आमदार अदिती तटकरे यांनी उत्तर दिले असता महाराष्ट्र सरकारने व महिला व बालविकास विभागाने अर्जाची पुन्हा पडताळणी करण्यासंदर्भात कुठलाच निर्णय घेतला नाही त्यामुळे अर्ज मंजूर असणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ अवश्य मिळणार आहे.
Ladki Bahin Yojana Important Link
Ladki Bahin Yojana Check Installment | Click Here |
Ladki Bahin Aadhar Link Check | Click Here |
Ladki Bahin Yojana Aadhar Link Process | Click Here |
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .