Ladki Bahin Yojana New Update : अर्जांची छाननी सुरू, 10 हजार लाडक्या बहिणी झाल्या अपात्र, पहा संपूर्ण माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ladki Bahin Yojana New Update In Marathi : महाराष्ट्र राज्यातील सर्वात लोकप्रिय योजना या योजनेला मोठ्या प्रमाणात महिलांचा प्रतिसाद मिळाला आहे त्या योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेच्या मदतीने महाराष्ट्र सरकारने अवघ्या काही महिन्यांमध्ये पाच हप्त्याची पैसे साडेसात हजार रुपये महिलांना दिलेली आहेत या योजनेचा लाभ घेऊन महिला आपल्या परिवाराचा सांभाळ करू शकतील आणि त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू नये या उद्देशाने ही योजना महायुती सरकारने लागू केली आहे.

त्याचप्रमाणे राज्यातील कोणतीही महिला योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये याकरिता या योजनेच्या कालावधीमध्ये 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत वाढ पण करण्यात आली होती या कालावधीमध्ये अनेक महिलांनी ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज सादर केले परंतु त्यांचे अर्ज अद्याप मंजूर करण्यात आलेले नव्हते परंतु महाराष्ट्र सरकारकडून अस्या अर्जाची छाननी सुरू करण्यात आलेली आहे त्यामध्ये दहा हजार लाडक्या बहिणी अपात्र ठरलेले आहेत तर आज आपण या संदर्भात संपूर्ण माहिती पुढे पाहणार आहोत.

लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची छाननी सुरू

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक महिलांनी ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज सादर केले होते परंतु काही महिलांच्या अर्ज अद्याप मंजूर केले गेले नाही अशा सर्व महिलांचे अर्ज सरकारकडून छाननी करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे त्यामुळे महिलांनी आपल्या अर्जाची स्थिती तपासून घ्यावी जर अर्जा मध्ये काही त्रुटी दिलेली असेल ती त्रुटी दुरुस्त करून अर्ज पुन्हा सादर करून घ्यावा.

10 हजार लाडक्या बहिणी झाल्या अपात्र

महाराष्ट्र सरकारकडून उर्वरित अर्जाची पडताळणी करणे सुरू करण्यात आलेले आहे अनेक महिलांनी ऑक्टोबर महिन्यामध्ये अर्ज सादर केलेले होते परंतु राज्यात आचारसंहिता लागू झाल्यामुळे व वेळेअभावी त्या महिलांचे अर्ज पडताळणी करणे बाकी होते महिला बालविकास विभागाच्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यात दहा हजार लाडक्या बहिणीचे अर्ज अपात्र करण्यात आलेले आहे तर अजून 12000 हजार अर्जाची पडताळणी करणे बाकी आहे,

हे पण वाचा : डिसेंबर महिन्याचा हप्ता या तारखेला जमा होणार ? पहा संपूर्ण माहिती

Ladki Bahin Yojana New Update
Ladki Bahin Yojana New Update

पुणे जिल्ह्यामध्ये 20 लाख 84 हजार महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे योजनेच्या अंतिम तारखेपर्यंत जिल्ह्यातून 21 लाख 11 हजार 363 अर्ज मंजूर करण्यात आले होते तर त्यामध्ये 12000 अर्जाची छाननी करणे बाकी होते त्यामध्ये आतापर्यंत नऊ हजार 814 अर्ज त्रुटीमुळे सरकारकडून अपात्र करण्यात आलेली आहे.

Leave a Comment