Ladki Bahin Update In Marathi : महाराष्ट्र राज्यातील महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज केले आणि त्यांचा अर्ज मंजूर करून त्यांना पाच हप्त्याचे पैसे देण्यात आले परंतु सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे की लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या अर्जाची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे अशाच एक पुन्हा एक बातमी समोर येत आहे नाशिक जिल्ह्यातील 75 हजार लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलेल्या आहे तर आज आपण या संदर्भात सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत.
Table of Contents
महिलांना सहाव्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये
महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजनेच्या दोन कोटी 34 लाख महिलांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यापर्यंत पैसे दिलेले आहेत आता महिला या योजनेच्या सहाव्या हप्त्याची वाट पाहत आहे आमच्या लाडकी बहीण योजनेच्या टीमने माहिती काढली असता महाराष्ट्र राज्यामध्ये आतापर्यंत मंत्रिमंडळ स्थापन झाली नाही त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता महिलांच्या खात्यात जमा केला गेलेला नाही
परंतु म्हणजे 15 डिसेंबर 2024 रोजी राज्यात मंत्रिमंडळ स्थापन होणार आहे आणि त्यानंतर एक ते दोन दिवसाच्या आत लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महिलांच्या अर्जाची पुन्हा पडताळणी होणार ?
राज्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची पुन्हा पडताळणी केली जाणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार सरकारकडून असा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही त्यामुळे अजून तरी या योजनेच्या मंजूर अर्जाची पुन्हा पडताळणी केली जाणार नाही करिता महिलांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असे आव्हान आमदार अदिती तटकरे यांनी केलेले आहे.
हे पण वाचा : लाडकी बहीण योजने ची नवीन पात्र यादी जाहीर, पहा तुमचे नाव आहे का ?
या जिल्ह्यातील 75 हजार लाडक्या बहिणी अपात्र
महिला व बाल विभागाच्या माहितीनुसार नाशिक जिल्ह्यामध्ये 15 लाख 70 हजार महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे परंतु महिला व बालकल्याण विभागाने 75 हजार महिलांचे अर्ज बाद केलेली आहे मिळालेल्या माहितीनुसार अर्जदार महिलांनी अर्ज सादर करताना चुकीचे कागदपत्र अपलोड केलेले होते
त्याचप्रमाणे अर्जामध्ये दिलेली माहिती जसे आधार कार्ड हे चुकीचे टाकण्यात आले होते अशा वेगवेगळ्या कारणामुळे या योजनेअंतर्गत सुरुवातीलाच नाशिक जिल्ह्यामध्ये 75 हजार महिलांचे अर्ज कायमस्वरूपी रद्द करण्यात आलेले आहे
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .