Mazi Ladki Bahin Yojana News In Marathi : राज्यातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली या या योजनेची तरतूद मागील झालेल्या 2024 च्या अर्थसंकल्पात करण्यात आली आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून 28 जून 2024 रोजी या योजनेची घोषणा करण्यात आली या योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जात आहे आतापर्यंत सरकारने पाच हप्त्याची पैसे महिलांच्या खात्यात जमा केलेले आहेत.
आता महिला या योजनेच्या सहाव्या अत्याची आतुरतेने वाट पाहत आहे तर या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहांमध्ये या संदर्भात मोठी माहिती दिलेली आहे तर आज आपण या संदर्भात सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत.
Table of Contents
Mazi Ladki Bahin Yojana Overview
योजनेचे नाव | मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना |
योजनेची सुरुवात | 28 जून 2024 |
राज्य | महाराष्ट्र |
लाभार्थी | आर्थिक दृष्ट्या गरीब परिवारातील महिला |
आर्थिक मदत | 1500 दर महिन्याला |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन व ऑफलाइन |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 15 ऑक्टोबर 2024 |
Ladki Bahin Yojana Online Apply Link | Click Here |
Helpline No | 181 |
About Mazi Ladki Bahin Yojana
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या व गरीब परिवारातील महिलांना सरकार 1500 रुपये आर्थिक मदत करत आहे या योजनेच्या मदतीने राज्यातील गरीब महिला आपल्या परिवाराचा पालन पोषण करू शकतील व त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू नये या उद्देशाने ही योजना सरकारने लागू केली आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी ऑनलाइन व ऑफलाइन अर्ज सादर केला आणि सरकारकडून जुलै ते नोव्हेंबर पर्यंतचे सर्व पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा केले.
हे पण वाचा : या योजनेतून महिलांना मिळणार 7000 हजार रुपये महिना , अर्ज प्रक्रिया सुरू लगेच करा अशा प्रकारे अर्ज सादर
Mazi Ladki Bahin Yojana Eligibility
- अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे अनिवार्य आहे
- अर्जदार महिलांचे वय 21 ते 65 वयोगटातील असावे
- अर्जदार महिला जवळ स्वतःचे बँक पासबुक असावे
Mazi Ladki Bahin Yojana Document
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- अधिवास प्रमाणपत्र, शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र, मतदान कार्ड, राशन कार्ड, जन्म प्रमाणपत्र ( यापैकी कोणतेही एक कागदपत्र 15 वर्ष पूर्वीची असणे बंधनकारक आहे )
- उत्पन्नाचा दाखला किंवा केसरी तथा पिवळ्या रंगाची राशन कार्ड
- हमीपत्र
- अर्जदार महिलांचा फोटो
- बँक पासबुक आधार लिंक असणे अनिवार्य
लाडकी बहीण योजना अर्ज प्रक्रिया
महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केली होती अर्ज करण्यासाठी 1 जुलै 2024 ते 15 ऑक्टोबर 2024 हे कालावधी ठेवण्यात आली होती या कालावधीमध्ये 3 कोटीच्या जवळपास ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज सरकारकडे प्राप्त झाले त्यामधील 2 कोटी 34 लाख महिलांना सरकारने लाभ दिलेला आहे
परंतु या योजनेची अर्ज प्रक्रिया सरकारने सध्या बंद केलेली आहे जर सरकारने योजनेची नवीन अर्ज प्रक्रिया सुरू केली तर तुम्हाला या वेबसाईटच्या माध्यमातून माहिती दिली जाईल.
Mazi Ladki Bahin Yojana New Update
महायुती सरकारकडून राज्यातील महिलांना विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान आश्वासन देण्यात आले होते की राज्यामध्ये पुन्हा महायुतीचे सरकार आल्यास आम्ही या योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या रकमेत वाढ करून 2100 महिना देऊ आणि महिलांच्या आशीर्वादाने राज्यात महायुती सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्व स्थापन झाले.
परंतु आतापर्यत या योजनेचा डिसेंबर चा हप्ता महिलांच्या खात्यात जमा केला नाही त्यामुळे महिलांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे की हि योजना पुढे सुरू राहणार की नाही ? यासंदर्भात माहिती मिळाली असता नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 19 डिसेंबर 2024 रोजी हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान सभागृहामध्ये बोलताना ते लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची माहिती दिली ते म्हणाले आम्ही जे आश्वासन दिले आहेत ते आम्ही पूर्ण करणार आणि लाडकी बहीण योजना ही सुरूच राहणार असे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच आम्ही एकही योजना बंद पडू देणार नाही अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबर चे पैसे जमा केले जातील दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की या योजनेच्या कोणत्या निकषांत अद्याप बदल करण्यात आलेले नाहीत त्यामुळे महिलांचे अर्ज मंजूर आहे तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार.
त्याचप्रमाणे सूत्राच्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबर आणि जानेवारी महिन्यांचे 3000 हजार रुपये जमा केले जाणार असल्याची माहिती माहिती समोर येत आहे .
FAQ- Mazi Ladki Bahin Yojana
Mazi Ladki Bahin Yojana Last Date
15 ऑक्टोंबर 2024
लाडक्या बहिणीच्या खात्यात सहावा हप्ता कधी जमा होणार ?
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 19 डिसेंबर 2024 रोजी अधिवेशनात बोलताना ते म्हणाले की आम्ही लाडकी बहीण योजनेचा हप्ता अधिवेशन झाल्यानंतर महिलांच्या खात्यात जमा करू त्यामुळे महिलांच्या खात्याला अधिवेशन संपल्यानंतर या योजनेचा हप्ता जमा होणार आहे.
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .