Ladki Bahin Yojana 6th Eligible List News In Marathi : महाराष्ट्र राज्यातील सर्वात लोकप्रिय योजना ज्या योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेला महायुती सरकारने 28 जून 2024 रोजी सुरू केले आहे आणि या योजनेच्या माध्यमातून 2 कोटी 34 लाख पात्र महिलांना लाभ देण्यात आलेला आहे आणि लवकरच या योजनेचा सहावा हप्ता सरकारकडून वितरित केला जाणार आहे .
परंतु सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा चालू आहे की लाडकी बहीण योजनेच्या मंजूर अर्जाची पुन्हा पडताळणी केली जाणार व ज्या महिला या योजनेच्या निकषांमध्ये बसणार नाहीत अशा महिलांना या योजनेतून वगळले जाणार तर यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे ते आपण सविस्तर पुढे पाहणार आहोत.
पात्र महिलांच्या अर्जाची पडताळणी होणार ?
महाराष्ट्र सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना सुरू केली आणि जुलै ते नोव्हेंबर पर्यंतचे सर्व हप्ते दोन कोटी 34 लाख महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले परंतु सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे आता लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सर्व पात्र महिलांना लाभ मिळणार नाही कारण सरकारकडून पात्र महिलांच्या अर्जाची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे.
यासंदर्भात आमच्या टीमने पडताळणी केली असता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीला सांगितले होते की लाडकी बहीण योजना आम्ही सुरूच ठेवणार फक्त निकषांमध्ये बसणाऱ्या महिलांनाच या योजनेचा लाभ देणार व त्याचप्रमाणे हिवाळी अधिवेशनादरम्यान सभागृहामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की ज्या महिलांची अर्ज मंजूर आहेत अशा सर्व महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार कोणत्याही महिलांना आम्ही अपात्र करणार नाही.
हे पण वाचा : हे काम करा तरच मिळतील लाडकी बहीण योजनेचे पैसे, सरकारने जारी केले निर्देश
त्यामुळे सध्या तरी अर्ज पुन्हा पडताळणीचा निर्णय सरकारने घेतलेला नाही त्यामुळे महिलांनी अशा अफवा विश्वास ठेवू नये.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने केली मोठी घोषणा
महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये लाडकी बहिण योजने संदर्भात महत्त्वाची घोषणा केलेली आहे त्या सभागृहात बोलताना ते म्हणाले की लाडकी बहीण योजना ही सुरूच राहणार आणि त्याच प्रमाणे लाडक्या बहिणीच्या खात्यात अधिवेशन झाल्यानंतर या योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात आम्ही जमा करू.
त्यामुळे राज्यातील कोठीविधी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे की लवकरच लाडकी बहीण योजनेचा पैसा महिलांच्या खात्यात जमा होणार आहे व त्याचप्रमाणे या योजनेसाठी सरकारने हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 1400 कोटी रुपयांची तरतूद पण केलेली आहे.
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .