https://ladakibahin.maharashtra.gov.in , Ladki Bahin Yojana Online Apply 2025, New Registration, Eligibility, Documents, Status, Last Date @

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

https://ladakibahin.maharashtra.gov.in : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना महाराष्ट्र राज्यातील सर्वात लोकप्रिय आणि चर्चेत असलेली योजना आहे या योजनेच्या मदतीने 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांना राज्य सरकारकडून 1500 रुपये महिना दिला जात आहे आतापर्यंत सरकारने या योजनेचे सहा महिन्याचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा केल्या आहेत तर आज आपण या योजनेसाठी कशाप्रकारे ऑनलाईन अर्ज करायचा या संदर्भात संपूर्ण माहिती आपण पुढे पाहणार आहोत .

Overview : ladakibahin.maharashtra.gov.in

योजनेचे नावमुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना
योजनेची सुरुवात28 जून 2024
राज्यमहाराष्ट्र
विभागमहिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील गरीब कुटुंबातील महिला
आर्थिक मदत1500 रुपये महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन व ऑफलाइन
Ladki Bahin Yojana Websitehttps://ladakibahin.maharashtra.gov.in
हेल्पलाइन नंबर181
Ladki Bahin Yojana Online Apply LinkCLick Here

About Ladki Bahinn Yojana

महाराष्ट्र सरकारने 2024-25 या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली या योजनेच्या माध्यमातून कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांना 1500 महिना देण्याचा सरकारने निर्णय घेतला या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना सरकारने ऑनलाईन व ऑफलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध केली होती त्यामध्ये दोन कोटी 65 लाख पेक्षा अधिक महिलांनी ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज सरकारकडे सादर केले .

त्यापैकी सरकारने डिसेंबर महिन्यापर्यंत दोन कोटी 47 लाख महिलांना सहा महिन्याचे पैसे त्यांचे बँक खात्यात जमा केले या योजनेचा लाभ घेऊन महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम होतील व त्यांना आपल्या परिवाराचा सांभाळ करण्यासाठी अडचणी निर्माण होणार नाहीत या उद्देशाने सरकारने हि योजना लागू केली आहे.

Ladki Bahin Yojana Eligibility

  • अर्जदार महिलाही महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे
  • अर्जदार महिलांच्या कुटुंबाच्या सदस्यांच्या नावे चार चाकी वाहन नसावे
  • अर्जदार महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे
  • अर्जदार महिलाही शासनाच्या इतर आर्थिक योजनेची लाभार्थी नसावी
  • अर्जदार महिलांचे वय 21 ते 65 वयोगटातील असावे
  • अर्जदार महिलांच्या नावे स्वतःची बँक खाते असणे अनिवार्य आहे

Ladki Bahin Yojana Document List

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे अत्यंत अनिवार्य आहे त्याची माहिती खालील प्रमाणे आहे.

  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • हमीपत्र
  • शाळा सोडण्याचा दाखला
  • पासपोर्ट साईज फोटो
  • राशन कार्ड

महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केली होती सरकारने सुरुवातीला नारीशक्ती ॲपच्या माध्यमातून महिला स्वतः किंवा अंगणवाडी व तसेच सेतू केंद्र मार्फत ऑनलाइन अर्ज सादर करू शकत होत्या परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे नारी शक्ती ॲपच्या द्वारे सरकारने अर्ज प्रक्रिया बंद करून या योजनेची अधिकृत वेबसाईट https://ladakibahin.maharashtra.gov.in लॉन्च केली आणि या वेबसाईटचे माध्यमातून अर्ज प्रक्रिया सरकारने सुरू केली.

याचे पण वाचा : मोठी बातमी लाडक्या बहि‍णींवर कारवाई 5 महिन्याचे 7500 रूपये सरकारने घेतले परत

Ladki Bahin Yojana Online Apply 2025

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने ऑनलाईन अर्ज प्रक्रिया बंद केलेली आहे सरकारने ऑक्टोबर महिन्यामध्ये अंगणवाडी केंद्र मार्फत लाडकी बहीण योजनेचे अर्ज घेण्याची परवानगी दिलेली होती त्यासाठी सरकारने 15 ऑक्टोंबर 2024 ही शेवटची तारीख ठेवलेली होती त्यामुळे आता महिला ह्या योजनेसाठी नवीन अर्ज करू शकत नाहीत

ladakibahin.maharashtra.gov.in
ladakibahin.maharashtra.gov.in

जेव्हा या ( https://ladakibahin.maharashtra.gov.in ) योजनेचे नवीन अर्ज प्रक्रिया सुरू होईल तेव्हा आपल्या या वेबसाईटचे माध्यमातून आपल्याला माहिती दिली जाईल त्यासाठी तुम्ही आपल्या व्हाट्सअप चॅनलला जॉईन करून घ्या.

.

1 thought on “https://ladakibahin.maharashtra.gov.in , Ladki Bahin Yojana Online Apply 2025, New Registration, Eligibility, Documents, Status, Last Date @”

Leave a Comment