Ladki Bahin 3rd Kist Update In Marathi : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सध्या महाराष्ट्र मध्ये सुरू आहे या योजनेअंतर्गत आतापर्यंत दोन टप्प्यांमध्ये पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याची म्हणून तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात सरकारने जमा केलेली आहे आणि लवकरच या योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या खातात जमा होणार आहे त्यामुळे महिला वर्गामध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे.
परंतु तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा होण्यापूर्वी महिलांना काही गोष्टी करण्याची आवश्यकता आहे नाहीतर योजनेच्या माध्यमातून मिळणारे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार नाही त्यासाठी नेमकं काय करण्याचे आहे या संदर्भात आपण संपूर्ण माहिती पुढे जाणून घेऊया.
3 महिन्याचे 4500 रुपये लवकर जमा होऊन
महाराष्ट्र सरकारने मागील दोन टप्प्यांमध्ये लाखो मुलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून 3000 रुपये जमा केली आहे आणि आता ज्या महिलांचे अर्ज मंजूर झालेले आहेत आणि त्यांना आतापर्यंत योजनेचा लाभ मिळाला नाही अशा सर्व महिलांना ( Ladki Bahin 3rd Kist ) तीन महिन्याचे साडेचार हजार रुपये सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात खात्यामध्ये सरकार जमा करणार आहे.
हे काम केले नसेल तर नाही जमा होणार 4500 रुपये
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जर तुम्ही ऑनलाईन अर्ज केलेला आहे आणि तुमचा अर्ज मंजूर पण झालेला आहे परंतु अर्ज मंजूर झाला म्हणजे पैसे मिळणार का? तर याचे उत्तर आहे नाही विशेष म्हणजे अर्ज भरल्यानंतर तुम्हाला आणखी काही कामे करावे लागतात त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये योजनेचे पैसे जमा होतात.
लाडकी बहीण योजनेसाठी जेव्हा तुम्ही अर्ज केले असाल तेव्हा तुम्हाला आधार संबंधित माहिती मागितली होती आणि त्यामध्ये आधार कार्ड ला तुमचे खाते लिंक आहे का असं पर्याय तुम्हाला तिथे दिलेली होती आणि जर तुमचे खाते आधार लिंक नसेल तर तुम्हाला या योजनेचा पैसा मिळणार नाही त्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर आपले बँक खाते आधार लिंक करून घ्यावे जेणेकरून पुढील तिसरा हप्ता ( Ladki Bahin 3rd Kist ) तुमच्या खात्यामध्ये जमा होईल.
बँक खाते आधार लिंक कसे करावे
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमचे खाते आधार लिंक असणे अनिवार्य आहे त्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळचे बँक शाखेमध्ये जाऊन आधार लिंक करायचे आहे आधार लिंक करण्यासाठी तुम्हाला आधार लिंक फॉर्म सोबत बँक पासबुक आधार कार्ड जोडून बँक कर्मचारीकडे जमा करायचा आहे बँकेत कर्मचारी एक-दोन दिवसांमध्ये तुमचे खाते आधार लिंक करून देतील.
Ladki Bahin Yojana Important Link
Ladki Bahin Online Aadhar Link | Click Here |
Ladki Bahin Online Aadhar Link Check | Click Here |
Ladki Bahini Yojana Online Apply | Click Here |
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .
1 thought on “Ladki Bahin 3rd Kist : लाडकी बहिणींनो ₹4500 रुपये विसरा, जर हे काम केलं नसेल तर”