Devendra Fadnavis On Ladki Bahin 3rd Kist Date and Time : महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू असलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेला मोठ्या प्रमाणात महिलांचा प्रतिसाद मिळताना दिसत आहे महायुतीच्या सरकारने सुरू केलेली अत्यंत महत्त्वकांक्षी योजना आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील गोरगरीब महिलांना सरकार दर महिन्याला पंधराशे रुपये देत आहे या योजनेअंतर्गत आतापर्यंत दोन टप्प्यात पात्र लाखो महिलांच्या खात्यात पैसा जमा करण्यात आली आहे.
परंतु अशा लाखो महिला आहेत ज्यांचे अर्ज तर मंजूर झालेली आहे परंतु त्यांना योजनेचा पैसा मिळाला नाही अशा सर्व महिलांसाठी आता आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेचा हप्ता कधी जमा होणार ( Ladki Bahin 3rd Kist Date and Time ) या संदर्भात माहिती दिलेली आहे ती आपण सविस्तर पुढे पाहूया.
Table of Contents
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी काँग्रेस कोर्टामध्ये गेले आहे पण आम्ही कोर्टाला सांगितले आहे कि या योजनेसाठी बजेट आम्ही काढून ठेवलेला आहे हि योजना हवेमध्ये आणलेली नाही काँग्रेस कितीही विरोध केला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असा शब्द मी देतो असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले.
अजित पवार यांनी केला संताप व्यक्त
काँग्रेस मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेला कडाडून विरोध करत आहे या कारणाने अजित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे आमचे सरकार गोरगरिबांसाठी मदत करीत आहे आणि काँग्रेस म्हणतोय की आम्ही योजना बंद करू परंतु ही योजना आम्ही कधी बंद पडू देणार नाही असेल आश्वासन अजित पवार यांनी दिले.
हे पण वाचा : महिलांना एकूण किती हप्ते मिळणार आहेत ? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले संपूर्ण माहिती
लाडकी बहीण योजना ही दीर्घकाळासाठी आहे
लोकसत्ताच्या दिलेल्या मुलाखतीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे म्हणाले कि कोणती योजना एका रात्री जाहीर होत नाही त्यामागील बऱ्याच गोष्टीची तयारी असते व तसेच अभ्यास करावा लागतो या योजनेचा लाभ कुणाला द्यावा याचा सविस्तर अभ्यास करण्यात आला केवळ दारिद्र्यरेषी खालील महिलांसाठी योजना असावी की सर्व समावेश असावी त्यासाठी किती निधी लागेल ?
या सर्व बाबीवर व्यवस्थितपणे विचार करण्यात आला आणि आम्हालाही योजना दीर्घकाळ चालवायचे आहे त्यामुळे आम्ही विचारपूर्वक निर्णय घेतलेला आहे असे ते म्हणाले.
योजनेचा तिसरा हप्ता कधी जमा होणार
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी दोन कोटी पेक्षा अधिक महिलांनी ऑनलाईन अर्ज सादर केलेले आहे त्यामधील लाखो महिलांना या योजनेचा लाभ सरकारने दिलेला आहे परंतु अनेक महिलांना या योजनेचा लाभ मिळाला नाही यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर येथे आयोजित केलेल्या बांधकाम कामगार मेळाव्यात बोलत असताना ते म्हणाले.
महिलांना महाराष्ट्र सरकार वर्षाला 18 हजार रुपये म्हणजे महिन्याला दीड हजार प्रति महिना रुपये देत आहे ज्या महिलांचे अर्ज मंजूर आहे परंतु त्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही अशा सर्व महिलांना या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात त्यांच्या खात्यात पैसे जमा करू असे त्यांनी स्पष्ट केले.
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .