Ladki Bahin 6th Aprovel List In Marathi : महाराष्ट्र सरकारने राज्यातील गरीब महिलांना अर्थसहाय्य करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेच्या माध्यमातून दोन कोटी 34 लाख महिलांना लाभ देण्यात आला. आता महिलांना लाडकी बहीण योजनेच्या सहाव्या त्याची प्रतीक्षा आहे अशातच महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता लवकरच जमा करण्यात येणार आहे परंतु सहाव्या हप्त्याच्या पात्र महिला कोणत्या आहेत आणि कोणत्या महिलांना 2100 रुपये हप्ता मिळणार तर आज आपण या संदर्भात सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत .
Table of Contents
लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये हप्ता
महायुती सरकारने मागील झालेल्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आणि काही महिन्यांमध्येच ही योजना यशस्वी राबवण्यात आली तसेच विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुती सरकारकडून महिलांना आश्वासन देण्यात आले होते की राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकार आल्यास महिलांना या योजनेअंतर्गत 2100 रुपये महिना देऊ आणि लाडक्या बहिणीच्या आशीर्वादाने राज्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुती सरकार स्थापन झाले आहे .
या तारखेला जमा होणार लाडकी बहीण योजनेचा हप्ता
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महिलांना आश्वासन दिले होते की आमचे सरकार पुन्हा राज्य मध्ये स्थापन झाल्या काही दिवसातच लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता दिला जाईल परंतु 14 डिसेंबर 2024 तारीख आलेली आहे परंतु आत्तापर्यंत महिलांना या योजनेचा सहावा हप्ता मिळालेला नाही या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार राज्याचे मंत्रिमंडळ अजून स्थापित होणे बाकी आहे आणि 15 डिसेंबर 2024 रोजी राज्यात मंत्रिमंडळ स्थापन होणार आहे मंत्रिमंडळ स्थापन झाल्यास एक ते दोन दिवसांमध्ये महिलांच्या खात्यात या योजनेचे पैसे जमा होण्याची शक्यता आहे.
फक्त याच महिलांना मिळणार 2100 रुपये महिना
महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना 2100 रुपये महिना दिला जाणार आहे परंतु राज्यात अशा अनेक महिला आहेत ज्यांना या योजनेअंतर्गत ऑक्टोबर महिन्यापर्यंत लाभ तर मिळाला परंतु त्यांना इथून पुढे या योजनेचा लाभ मिळणार नाही यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेसाठी अनेक निराधार महिलांनी ऑनलाईन अर्ज सादर केले आणि त्याच प्रमाणे त्यांचा अर्ज मंजूर पण झाला व त्यांना या योजनेअंतर्गत पाच हप्त्याचे पैसे मिळाले परंतु आता अशा महिलांना महाराष्ट्र सरकारकडून अपात्र घोषित करण्यात आलेले आहे आता फक्त नियमांमध्ये बसणाऱ्या महिलांना या योजनेअंतर्गत 2100 रुपये महिना दिला जाणार आहे.
Ladki Bahin 6th Aprovel List Important Link
Ladki Bahin Yojana Check Installment | Click Here |
Ladki Bahin Aadhar Link Check | Click Here |
Ladki Bahin Yojana Aadhar Link Process | Click Here |
Ladki Bahin 6th Aprovel List | Click Here |
FAQ- Ladki Bahin 6th Aprovel List
लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता कधी जमा होणार ?
महाराष्ट्र राज्याचे नवीन मंत्रिमंडळ 15 डिसेंबर 2024 रोजी स्थापन होणार आहे आणि मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर पुढील एक ते दोन दिवसांमध्ये या योजनेचा सहावा हप्ता जमा होणार असल्या संदर्भात माहिती समोरीत येत आहे.
लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पुन्हा पडताळणी केली जाणार का ?
महिला व बाल विकास विभागामार्फत लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पुन्हा पडताळणी केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे परंतु आतापर्यंत सरकारने असा कोणताच निर्णय घेतलेला नाही त्याकरिता सध्यातरी अर्जाची पडताळणी करणे सुरू नसल्याचे दिसून येत आहे.
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .