Ladki Bahin Aadhar Link News In Marathi : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही योजना महाराष्ट्र राज्यातील लोकप्रिय योजना आहे या योजनेला राज्यभरातून महिलांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे या योजनेच्या माध्यमातून सरकारने महिलांना 1500 दर महिन्याला देण्यास सुरुवात केली आतापर्यंत योजनेअंतर्गत 2 कोटी 34 लाख महिलांना सरकारने लाभ दिलेला आहे.
महायुती सरकारला याच योजनेमुळे विधानसभा निवडणुकीमध्ये मोठे यश प्राप्त झालेले आहे परंतु अशातच या योजनेसाठी अर्ज करून सुद्धा 27 लाख लाडक्या बहिणींना या योजनेचे लाभ अद्याप मिळाला नाही तर आज आपण 27 लाख महिला या योजनेच्या लाभापासून वंचित का आहेत या संदर्भात सविस्तर माहिती पुढे आपण पाहणार आहोत.
Table of Contents
Ladki Bahin Aadhar Link Overview
योजनेचे नाव | मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना |
सुरुवात | 28 जून 2024 |
राज्य | महाराष्ट्र |
विभाग | महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन |
लाभार्थी | महिला |
आर्थिक मदत | 1500 रुपये महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन ऑफलाइन |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 15 ऑक्टोबर 2024 |
अधिकृत वेबसाईट | https://ladakibahin.maharashtra.gov.in/ |
हेल्पलाइन नंबर | 181 |
27 लाख लाडक्या बहिणी लाभापासून वंचित ?
महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकारने 2 कोटी 34 लाख महिलांना पाच हप्त्याचे पैसे दिलेले आहेत परंतु अशा अनेक महिला आहेत ज्यांच्या अर्ज मंजूर तर आहे परंतु त्यांना या योजनेचा एकही हप्ता मिळाला नाही या संदर्भात मीडिया रिपोर्ट नुसार माहिती मिळाली असता 27 लाख अशा महिला आहेत ज्यांचे अर्ज मंजूर आहे परंतु त्यांची बँक खाते आधार लिंक नसल्यामुळे त्यांना या योजनेचा एकही हप्ता मिळाला नाही.
त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांनी आपले बँक खाते आधार लिंक करून घ्यावी त्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल अन्यथा या योजनेच्या लाभापासून तुम्ही वंचित राहू शकता.
बँक खाते आधार लिंक करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
बँक खाते आधार लिंक करण्यासाठी काही आवश्यक कागदपत्रे तुमच्याकडे असणे अत्यंत अनिवार्य आहे
- तुमच्याकडे राष्ट्रकृत बँकेचे बँक पासबुक असणे आवश्यक
- आधार कार्ड
- आधार लिंक फॉर्म
बँक खाते आधार लिंक कुठे करावे ?
- बँक खाते आधार लिंक करण्यासाठी अगदी सोपी पद्धत आहे
- त्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या बँक शाखेमध्ये जावे लागेल
- बँक शाखेत गेल्यानंतर बँक अधिकारी कडून आधार लिंक फॉर्म घ्यायचा आहे
- आधार लिंक फॉर्म व्यवस्थित भरून आवश्यक कागदपत्रे जोडून घ्या
- त्यानंतर बँक अधिकारी कडे आधार लिंक फ्रॉम जमा करायचे आहे
- बँक अधिकारी मार्फत तुमची बँक खाते एक ते दोन दिवसांमध्ये आधार लिंक केली जाईल
तर अशाप्रकारे तुम्ही सोप्या पद्धतीने बँक खाते आधार लिंक करू शकता
Ladki Bahin Aadhar Link From pdf
File Name | Ladki Aadhar Link Form Pdf |
Size | 32kb |
Download Link | Click Here |
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .
1 thought on “Ladki Bahin Aadhar Link : एका चुकीमुळे 27 लाख लाडक्या बहिणी लाभापासून वंचित ? लगेच करा आहे काम”