Ladki Bahin Online Apply Link : महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू असलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेला राज्यभरातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसत आहे आणि त्याच प्रमाणे पूर्ण देशभर या योजनेची चर्चा पण होत आहे मागील झालेल्या 2024-25 चा अर्थसंकल्पात महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून या योजनेची घोषणा करण्यात आली आहे .
सध्या महाराष्ट्र मध्ये महायुतीचे सरकार आहे या सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक स्वतंत्र देण्यासाठी व त्यांना आपल्या परिवाराचा सांभाळ करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना सरकार दर महिन्याला १ ५ ० ० रुपये देणार आहे
त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारने 14 ऑगस्ट 2024 पासून या योजनेचा पहिला हप्ता जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा मिळून 3000 रुपये पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे आणि लाखो महिलांच्या खात्यामध्ये या योजनेचा पैसा पण जमा पण झालेला आहे.
परंतु अशा अनेक महिला आहेत ज्यांनी आतापर्यंत आपले ऑनलाइन अर्ज सादर केले नाही किंवा अर्ज सादर केले आहेत पण मंजूर झाले नाहीत व त्याप्रमाणे आधार लिंक नसल्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये पैसा जमा झालेला आहे
तर आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकीबहीण योजने संदर्भात अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण पुढे पाहणार आहोत त्याकरिता तुम्ही या आर्टिकलला शेवटपर्यंत जरूर वाचा जेणेकरून योजने संदर्भात तुम्हाला काही अडचणी येणार नाही.
Table of Contents
Ladki Bahin Online Apply Link Overview
योजनेचे नाव | मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना 2024 |
योजनेची अंमलबजावणी | 28 जून 2024 |
योजनेची लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील गरीब परिवारातील महिला |
योजनेचे उद्देश | राज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करून त्यांना आर्थिक स्वतंत्र करणे |
आर्थिक मदत | 1500 रुपये प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 30 सप्टेंबर 2024 |
Ladki Bahin Online Apply Link | https://ladakibahin.maharashtra.gov.in |
हेल्पलाइन नंबर | 181 |
लाडकी बहीण योजनेची वैशिष्ट्ये
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्याची एक महत्त्वकांक्षी योजना आहे राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब व कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांना अडचणीचा सामना करावा लागू नये म्हणून महायुतीच्या सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेला राज्यभरातून मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळताना दिसत आहे
या योजनेसाठी राज्यभरातून दोन कोटीच्या जवळपास ऑनलाईन अर्ज सरकारकडे प्राप्त झाले आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना सरकार 1500 रुपये दर महिन्याला देणार आहे आणि त्याच प्रमाणे सरकारने या योजनेचा पहिला हप्ता लाखो महिलांच्या खात्यामध्ये जमा पण केलेला आहे.
लाडकी बहीण योजनेची पात्रता
- अर्जदार लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे
- विवाहित, विधवा, घटस्फोटीत, पहरत्यक्त्या व त्याचप्रमाणे निराधार महिला या योजनेसाठी पात्र असतील
- अर्जदार महिलेचे वय 21 ते 65 वर्ष वयोगटातील असावे
- अर्जदार महिलेचे व्यक्तिगत बँक पासबुक असणे आवश्यक आहे
- अर्जदार महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे
हे पण वाचा : Ladki Bahin Yojana Status Check : वेबसाईटने केलेले लाखो अर्ज रिजेक्ट, लगेच चेक करा तुमच्या अर्जाची स्थिती
लाडकी बहीण योजनेची अपात्रता
- अर्जदार महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर ती महिला या योजनेसाठी अपात्र असणार
- अर्जदार महिलाच्याकुटुंबातील सदस्य आयकर दाता असेल तर ती महिला अपात्र असणार
- अर्जदार महिलाच्या कुटुंबातील सदस्य/नियमित/कायम कर्मचारी/कंत्राटी कर्मचारी व तसेच सरकार विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत असेल तर व तसेच बाह्य यंत्र द्वा कार्यरतअसलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी असेल तर ती महिला या योजनेसाठी अपात्र ठरणार
- अर्जदार महिला जर शासनाच्या इतर विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे जर दर महिन्याला पंधराशे रुपये लाभ घेत असेल तर ती महिला या योजनेसाठी अपात्र ठरला
- अर्जदार महिलांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार /आमदार असेल तर ती महिला या योजनेसाठी अपात्र ठरनार .
- अर्जदार महिलांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉर्पोरेशन बोर्ड/उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक व तसेच सदस्य असल्यास ती महिला या योजनेसाठी अपात्र ठरणार
- अर्जदार महिलांच्या कुटुंबाच्या सदस्याकडे संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेती असेल ती महिला या योजनेसाठी अपात्र ठरणार
- अर्जदार महिलांच्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर ( ट्रॅक्टर सोडून ) चार चाकी वाहन असेल तर ती महिला पण या योजनेसाठी अपात्र ठरणार
तर अशा प्रकारे या योजनेच्या अपात्रता आहेत आणि त्याच प्रमाणे सरकार वेळोवेळी ह्या अपात्रता नियमांमध्ये बदल करू शकते.
लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- अर्जदार महिलांचे आधार कार्ड
- महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र/महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला/शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र/मतदान कार्ड/राशन कार्ड यापैकी कोणतेही एक
- बँक पासबुक
- पासपोर्ट साईज फोटो
- उत्पन्न प्रमाणपत्र किंवा राशन कार्ड
- हमीपत्र
लाडकी बहीण योजनेची निवड प्रक्रिया
- सर्वात पहिले तुम्हाला योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल
- त्यानंतर तुमचे अर्ज तालुकास्तरीय समितीकडे पडताळणीसाठी जाणार
- तालुकास्तरीय समिती अर्ज पडताळणी करून जिल्हा समितीकडे पात्र यादी पाठवणार
- जिल्हास्तरीय समितीकडून राज्य सरकारकडे पात्र यादी पाठवणार
- त्यानंतर राज्य शासनाकडून या योजनेचा पैसा पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा केला केला जाणार
लाडकी बहीण योजना अर्ज प्रक्रिया
- सर्वात पहिले तुम्हाला योजनेच्या अधिकृत वेबसाईट पोर्टलवर जावे लागेल
- त्यामध्ये तुम्हाला होम पेजवर अर्जदार लॉगिन या ऑप्शन दिसेल त्यावर वर क्लिक करायचा आहे
- क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर लॉगिन पेज ओपन होणार
- त्यामध्ये तुमची युजर आयडी पासवर्ड टाकून लॉगिन करून घ्यायचा आहे
- जर तुमच्याकडे यूजर आयडी पासवर्ड नसेल तर Create Account ? ह्या ऑप्शन वर क्लिक करून यूजर आयडी पासवर्ड तयार करून घ्या
- लॉगिन केल्यानंतर वरच्या भागांमध्ये तुम्हाला Application of Mukhyamantri – Majhi Ladki Bahin Yojana या ऑप्शन वर क्लिक करावे
- त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक मागितला जाईल त्यामध्ये तुम्हाला आधार नंबर व कॅपच्या टाकून Validate Aadhar याऑप्शन वर क्लिक करायचं आहे.
- आता तुमच्यासमोर योजनेचा अर्ज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला आधार प्रमाणे तुमचे नाव व पत्ता मागितला जाईल तो व्यवस्थित भरून घ्यावा
- त्यानंतर तुम्हाला तुमची बँकेची माहिती विचारली जाईल बँकेची माहिती तुम्ही अचूक पद्धतीने भरून घ्यावी
- शेवटी तुम्हाला सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहेत शक्यतोर कागदपत्रे ओरिजनल स्कॅन करून अपलोड करून घ्यावे
- कागदपत्रे अपलोड केल्यानंतर Submit या बटनावर क्लिक करावे
- तुमच्यासमोर Registration Preview पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्ही भरलेली संपूर्ण माहिती तुम्हाला दाखवली जाईल ती एकदा चेक करून कॅपच्या फील करून घ्यावे
- त्यानंतर Submit बटनावर क्लिक करून अर्ज सबमिट करून घ्यावा
- अर्ज सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर तुम्हाला अर्जाची पावती दिसेल व अर्ज क्रमांक जनरेट होईल
- त्याची प्रिंट काढून तुम्ही सांभाळून ठेवू शकता
अशा प्रकारे तुम्ही मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता
ह्या महिलांना मिळणार ₹ 4500 रुपये
महाराष्ट्र शासनाने या योजनेचा पहिला हप्ता 14 ऑगस्ट 2024 पासून लाखो महिलांच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून वितरित केला आहे परंतु अनेक महिलांना या योजनेचा पहिला हप्ता जमा झाला नाही परंतु जर तुमचे अर्ज मंजूर आहे पण तुमचा पैसा जमा झाला नाही तर तुम्ही तुमचे बँक खाते आधारशी लिंक करून घ्या येत्या दहा दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये या योजनेचा पहिला हप्ता जमा होऊन जाईल
आणि ज्या महिलांचे अर्ज अजून पण पेंडिंग आहे व मंजूर झाले नाही त्यांना महाराष्ट्र सरकार तीन महिन्याचे मिळून ₹ 4500 रुपये देणार आहे.
Ladki bahin Yojana Important Link
Ladki Bahini Yojana Online Apply Link | Click Here |
Ladki Bahin Online Aadhar Link | Click Here |
Ladki Bahin Aadhar Link Check | Click Here |
Ladki Bahin Yojana Approved List | Click Here |
Ladki Bahin Yojana Balance Check | Click Here |
FAQ- Ladki Bahin Online Apply Link
Ladki Bahin Yojana Website Link
Ladki Bahin Online Apply Link
https://majhiladkibahin.in
लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख
30 सप्टेंबर 2024
अर्ज करण्यासाठी लाभार्थी महिलांची वय किती असावे
लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिलांचे वय 21 ते 65 वयोगटातील असावे
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .
not able to login to site its getting auto logout and also nari doot app also not working
ब्राउझर मधली हिस्टरी व कुकीज डिलीट करून पुन्हा एकदा लॉगीन करून पहा अन्यथा थोड्या वेळाने ट्राय करा