Ladki Bahin Yojana : लाडक्या बहीनेचे अर्ज मंजूर आणि खाते आधार लिंक तरी पण का जमा झाले नाही पैसे ?

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ladki Bahin Yojana New Update In Marathi : राज्यातील गरीब महिलांना महाराष्ट्र सरकारने आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना 28 जून 2024 रोजी सुरू केली या योजनेचे अर्ज प्रक्रिया 1 जुलै 2024 ते 15 ऑक्टोबर 2024 हे ठेवण्यात आलेली होती या कालावधीमध्ये 3 कोटीच्या जवळपास ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज महिलांनी सादर केले त्यामधील 2 कोटी 34 लाख महिलांना सरकारने पाच हप्त्याचे पैसे हस्ताक्षरण केले.

परंतु अशातच राज्यांमध्ये अशा लाखो महिला आहेत ज्यांची अर्ज मंजूर झालेली आहे व त्याचप्रमाणे त्यांची बँक खाते पण आधार लिंक आहे तरी पण त्यांना या योजनेचा एकही हप्ता मिळाला नाही तर अशा महिलांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत आहे की आम्हाला या योजनेचा पैसा मिळणार का नाही ? तर आज आपण यासंदर्भात सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत.

मंत्रिमंडळ स्थापन पण कधी मिळणार 2100 रुपये ?

महायुती सरकारकडून विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राज्यातील महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणाऱ्या 1500 रुपये महिन्या ऐवजी 2100 रुपये महिना देऊ असे आश्वासन देण्यात आले होते अशातच लाडक्या बहिणीच्या आशीर्वादाने विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात महायुती सरकारला बहुमत मिळाले आणि राज्यांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुती सरकार स्थापन झाले.

परंतु महायुती सरकार राज्यांमध्ये स्थापन होऊन दोन आठवडे होत आहेत तरीपण राज्यातील लाडक्या बहिणींना या योजनेअंतर्गत सहाव्या हप्त्याचे पैसे हस्ताक्षर करण्यात आलेले नाही यासंदर्भात माहिती मिळाली असता राज्याचे मंत्रिमंडळ स्थापन होणे बाकी होते त्यामुळे महिलांना या योजनेचा लाभ हस्ताक्षर करण्यात आला नाही असे सांगण्यात येत होते परंतु 15 डिसेंबर 2024 रोजी राज्यात नवे मंत्रिमंडळ स्थापन झालेले आहे तर आता महिलांना या योजनेचे अंतर्गत लाभ कधी मिळणार ? असा प्रश्न महिलांकडून उपस्थित केला जात आहे

तरी या संदर्भात आमच्या टीमकडून माहिती प्राप्त केली असता राज्यामध्ये आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू झालेले आहे तर पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये लाडकी बहीण योजनेच्या वाढीव हप्त्या संदर्भात मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे महिलांना पुन्हा काही दिवस वाट पाहावी लागेल.

हे पण वाचा : Ladki Bahin Aadhar Link Check : आधार लिंक खाते चेक करा फक्त 2 मिनिटात, लगेच जमा होतील पैसे

उर्वरित महिलांना कधी मिळणार योजनेचे पैसे

महाराष्ट्र राज्यातील गरीब महिलांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज सादर केले आणि तालुकास्तरीय समिती मार्फत त्यांचे अर्ज पण मंजूर करण्यात आले परंतु तसेच महिलांचे बँक खात्या आधार लिंक आहे तरी पण त्यांना या योजनेचा एकही पैसा मिळाला नाही त्यामुळे महिलांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत आहे की आम्हाला या योजनेचे लाभ मिळणार का नाही ?

Ladki Bahin Yojana New Update
Ladki Bahin Yojana New Update

यासंदर्भात आमच्या टीमने माहिती काढली असता ज्या महिलांचे अर्ज मंजूर आहे व त्याचप्रमाणे त्यांची बँक खाते आधार लिंक आहे परंतु त्यांना काही तांत्रिक अडचणीमुळे या योजनेचा एकही पैसा मिळाला नाही अशा महिलांसाठी सरकार लवकरच मोठा निर्णय घेणार आहे सरकारकडून तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती गठित करण्यात येणार आहे त्या समितीमार्फत अशा सर्व महिलांची तक्रार घेऊन त्या तक्रारीचे निवारण करून त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

योजनेच्या मंजूर अर्जाची फेर पडताळणी होणार का ?

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या कर्जाची पुन्हा पडताळणी केली जाणारा अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे त्यामुळे महिलांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होत आहे या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार महिला व बाल विकास विभागामार्फत स्पष्ट सांगण्यात आले आहे की महाराष्ट्र सरकारकडून मंजूर अर्जाची पुन्हा पडताळणी केली जाणारा असा कोणताच निर्णय सरकार कडून घेण्यात आलेला नाही त्यामुळे महिलांनी अशा अफवावर विश्वास ठेवू नये ज्या महिलांचे अर्ज मंजूर आहे त्या महिलांना या योजनेअंतर्गत लाभ कायम दिला जाणार.

2 thoughts on “Ladki Bahin Yojana : लाडक्या बहीनेचे अर्ज मंजूर आणि खाते आधार लिंक तरी पण का जमा झाले नाही पैसे ?”

Leave a Comment