Ladki Bahin Yojana 10th Hapta News In Marathi : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा 10 वा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात कधी जमा होणार ? हप्ता जमा होण्याची तारीख काय आहे ? योजनेमधून कोणत्या महिलांना बाहेर करण्यात आले असे अनेक प्रश्न महिलांच्या मनात उपस्थित होत आहे तर आज आपण या संदर्भात सविस्तर माहिती पुढे पाहूया.
Ladki Bahin Yojana 10th Hapta Overview
योजनेचे नाव | मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना 2025 |
योजनेची सुरुवात | 28 जून 2024 |
राज्य | महाराष्ट्र |
विभाग | महिला व बालकल्याण विभाग महाराष्ट्र शासन |
आर्थिक मदत | 1500 रुपये महिना |
योजनेचे लाभार्थी | गरीब कुटुंबातील महिला |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन/ऑफलाइन |
Ladki Bahin Yojana Application Link | Click Here |
Ladki Bahin Yojana Website | Click Here |
About Ladki Bahin Yojana April Month Installment
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारकडून पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये देण्यात येत आहे. मार्च महिन्यामध्ये सरकारने फरवरी आणि मार्च महिन्याचा एकत्रितपणे हप्ता महिला दिवसाच्या निमित्ताने पात्र महिलांच्या खात्यात जमा केले आहे आता महिला एप्रिल महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे त्याचप्रमाणे योजनेतील लाभार्थी महिलांच्या अपात्रीच्या निकषाबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे
निकषात्मक न बसणाऱ्या महिलांना अपात्र ठरविण्यात येत आहे ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक आहे त्याचप्रमाणे महिलांच्या कुटुंबाकडे चार चाकी वाहन आहे अशा महिलांचे नावे योजनेतून वगळण्यात येणार आहे. महिलांच्या कुटुंबाची उत्पन्नाची माहिती मिळवण्यासाठी आयकर विभागाकडे राज्य सरकारने माहिती मागितले आहे ही माहिती मिळाल्यास अपात्र महिलांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे
एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार ?
मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार रामनवमीच्या दिवशी एप्रिल महिन्याचा हप्ता जमा करण्याची घोषणा केली जाईल असा अंदाज समोर येत होता पण आता 14 एप्रिल रोजी असलेल्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपूर्वी हप्त्याची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे परंतु याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

एप्रिल महिन्यामध्ये या महिलांना मिळणार साडेचार हजार रुपये
महाराष्ट्र सरकारने जुलै महिन्यापासून ते मार्च महिन्यापर्यंतचे नऊ हप्त्याचे पैसे 2 कोटी 63 लाख महिलांच्या खात्यात जमा केलेले आहेत परंतु अशा अनेक महिला आहेत ज्यांना काही तांत्रिक अडचणीमुळे फरवरी आणि मार्च महिन्याचा हप्ता मिळालेला नाही त्यामुळे अशा महिलांच्या खात्यात एप्रिल महिन्यामध्ये फरवरी, मार्च आणि एप्रिल महिन्याचे एकत्रितपणे साडेचार हजार रुपये जमा केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .