Ladki Bahin Yojana 2100 List News In Marathi : मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना ही योजना महाराष्ट्र राज्यामध्ये चर्चेचा विषय ठरलेली आहे या योजनेला सरकारने विधानसभा निवडणुकीच्या समोर सुरू केले आणि या योजनेची अंमलबजावणी पूर्ण क्षमतेने करून 2 कोटी 47 लाख महिलांना लाभ देण्यात आला महिला या योजनेचा लाभ घेऊन आपल्या परिवाराचा सांभाळ करतील व त्यांना आर्थिक अडचणीचा फटका बसू नये या उद्देशाने योजना सरकारने लागू केली आहे.
त्याचप्रमाणे सरकारने विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान राज्यातील महिलांना आश्वासन दिले होते महायुतीचे सरकार पुन्हा स्थापन झाल्यास या योजनेच्या मिळणाऱ्या हप्त्यात वाढ करून 2100 रुपये महिना दिला जाणार आणि लाडकी बहीण योजना गेम चेंज ठरली आणि विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारला मोठे यश प्राप्त झाले आणि पुन्हा महायुती सरकार राज्यत स्थापन झाले आता महिलांचे लक्ष या योजनेच्या 2100 रुपये हप्त्याकडे लागलेले आहे.
अशा सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र सरकारकडून 2100 रुपयाची नवीन पात्र यादी तयार करण्यात आलेली आहे त्यामध्ये कोणकोणत्या महिला पात्र आहेत व 2100 रुपये कधीपासून मिळणार हे सर्व माहिती आपण सविस्तर पुढे पाहणार आहोत
Table of Contents
Ladki Bahin Yojana 2100 List Overview
योजनेचे संपूर्ण नाव | मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना |
अंमलबजावणी | 28 जून 2024 |
राज्य | महाराष्ट्र |
लाभार्थी | 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या महिला |
आर्थिक मदत | 1500 रुपये महिना |
Ladki Bahin Yojana Last Date | 15 ऑक्टोबर 2024 |
Ladki Bahin Yojana Official Website | https://ladakibahin.maharashtra.gov.in/ |
हेल्पलाइन नंबर | 181 |
महिलांच्या खात्यात 2100 रुपये या दिवशी जमा होणार
महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राज्यातील लाडक्या बहिणींना आश्वासन दिले होते की राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा स्थापन झाल्यास या योजनेतून मिळणाऱ्या रकमेत वाढ करून 2100 रुपये महिना देऊ आणि लाडक्या बहिणीच्या आशीर्वादाने राज्यांमध्ये महायुती सरकार मोठ्या बहुमताने आले व त्यानंतर 24 डिसेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीमध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यात डिसेंबर महिन्याचे पैसे 1500 रुपये जमा करण्यात आले.
परंतु महिलांकडून असा प्रश्न उपस्थित केला जात आहे की सरकारने जे आश्वासन दिले होते की महायुती सरकार राज्यात पुन्हा आल्यास या योजनेअंतर्गत महिलांना 2100 रुपये देणार होते परंतु महिलांच्या खात्यात डिसेंबर महिन्या चे फक्त 1500 रुपये जमा करण्यात आले या संदर्भात माहिती मिळाली असता महाराष्ट्र सरकारकडून मार्च महिन्याच्या अर्थसंकल्पामध्ये या योजनेच्या वाढीव रकमेची तरतूद केली जाणार आहे व त्यानंतर महिलांना या योजनेअंतर्गत 2100 रुपये दिला जाणार आहे.
हे पण वाचा : जानेवारी महिन्याचे 1500 रुपये या दिवशी जमा होणार
फक्त याच महिलांना मिळणार 2100 रुपये
महाराष्ट्र सरकारकडून लवकरच महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2100 रुपये महिना दिला जाणार आहे परंतु अशातच राज्यातील अनेक महिला या योजनेतून वगळण्यात येणार आहे आणि जी महिला या योजनेसाठी पात्र राहतील त्याच महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे तर त्यामध्ये कोणकोणत्या महिला पात्र आहे ज्यांना 2100 रुपये महिना दिला जाणार त्याची माहिती आम्ही खाली दिलेली आहे.
- लाभार्थी महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असावे
- लाभार्थी महिलांच्या कुटुंबाच्या नावे चार चाकी वाहन नसावे
- लाभार्थ्या कुटुंबातील व्यक्ती आयकर दाता नसावा
- लाभार्थी कुटुंबातील दोन पेक्षा अधिक महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा .
- लाभार्थी महिला इतर केंद्र किंवा राज्याची आर्थिक योजनेची लाभार्थी नसावी
ज्या महिला वरील दिलेल्या निकषांमध्ये बसणार नाहीत त्या महिलांना या योजनेअंतर्गत 2100 रुपये महिना मिळण्याची शक्यता कमी आहे व त्याचप्रमाणे ज्या महिला या वरील दिलेल्या निकषांमध्ये बसतात अशा सर्व महिलांना योजनेअंतर्गत 2100 रुपये महिना दिला जाणार.
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .