Ladki Bahin Yojana 3000 : महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून राज्यातील आर्थिक दृष्ट्या व गरीब परिवारातील महिलांना महाराष्ट्र सरकार दर महिन्याला 1500 रुपये देणार आहे या योजनेची अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे आतापर्यंत या योजना अंतर्गत लाखो महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे.
परंतु काही कारणास्तव अर्ज मंजूर असताना पण या योजनेचा पैसा अनेकमहिलांना मिळाला नाही व त्याचप्रमाणे ज्या महिलांनी वेबसाईटचे मार्फत आगस्ट महिन्यांमध्ये ऑनलाइन अर्ज सादर केले होते अशा सर्व महिलांना या योजनेचा पहिला हप्ता त्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा होण्याची सुरुवात झालेली आहे तर आज आपण या संदर्भात संपूर्ण माहिती पुढे पाहूया.
Ladki Bahin Yojana 3000 Overview
योजनेचे नाव | मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना |
योजनेची घोषणा | 28 जून 2024 |
राज्य | महाराष्ट्र |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील रहिवासी महिला |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन / ऑफलाइन |
आर्थिक मदत | 1500 रुपये प्रति महिना |
Ladki Bahin Yojana Official Website Link | Click Here |
हेल्पलाइन नंबर | 181 |
कोण कोणत्या महिलांना मिळणार पैसे
महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै आणि ऑगस्ट महिन्याची मिळून तीन हजार रुपये ( Ladki Bahin Yojana 3000 ) उर्वरित पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे आणि अनेक महिलांच्या खात्यामध्ये या योजनेचा पैसा जमा पण झालेला आहे तर सरकार कोणकोणत्या महिलांच्या खात्यामध्ये पैसा जमा करणार आहे त्याची माहिती खालील प्रमाणे आहे.
- ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले होते परंतु त्यांचे बँक खाते आधार लिंक नसल्यामुळे त्यांना या योजनेचा पैसा मिळाला नाही अशा सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणे सुरू झालेले आहेत
- त्याचप्रमाणे ज्या महिलांचे अर्ज काही त्रुटी संदर्भात परत आलेले होते आणि तो अर्ज त्रुटी दुरुस्त करण्यात आलेला आहे परंतु तालुकास्तरीय समितीमार्फत मंजूर केला गेलेला नव्हता व काही दिवसा अगोदर मंजूर केला गेलेला आहे अशा पण महिलांना या योजनेचा पैसा जमा होणे सुरू झालेले आहे
- ज्या महिलांनी महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून 31 जुलै 2024 नंतर ऑनलाइन अर्ज सादर केले होते व त्यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत अशा महिलांना पण या योजनेचा पैसा मिळणे सुरू झाले आहे
उर्वरित महिलांना पैसे येणे सुरू
महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी योजनेअंतर्गत जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकत्रित रक्कम तीन हजार रुपये ( Ladki Bahin Yojana 3000 ) लाखो पात्र महिलांच्या खात्यामध्ये 14 ऑगस्ट 2024 ते 17 ऑगस्ट 2024 या कालावधीत जमा करण्यात आलेली आहे परंतु काही कारणास्तव अनेक महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नव्हते
हे पण वाचा : लाडकी बहीण योजनेचा पैसा जमा झालेला नाही ? सरकारने सांगितले मुख्य 2 कारण
अशा सर्व महिलांना व त्याप्रमाणे वेबसाईटच्या माध्यमातून अर्ज करणाऱ्या महिलांना ज्यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत त्यांच्या खात्यामध्ये महाराष्ट्र सरकारकडून जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून 3000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येते आहे.
या तारखेला जमा होणार पैसे
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारने उर्वरित महिलांच्या खात्यामध्ये पैसा जमा करण्याच्या तारखा जाहीर केलेले आहेत सरकारकडून 29, 30, 31 ऑगस्ट 2024 या कालावधीत या योजनेच्या सर्व पात्र महिलांना त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील.
Ladki Bahin Yojana Important Link
Ladki Bahin Yojana Official Website Portal Apply Link | Click Here |
Ladki Bahin Online Aadhar Link | Click Here |
Ladki Bahin Aadhar Link Check | Click Here |
Ladki Bahin Yojana Approved List | Click Here |
Ladki Bahin Yojana 2nd InstallmentCheck | Click Here |
re-Apply Ladki Bahin Yojana Reject Form | Click Here |
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .