Ladki Bahin Yojana 7th Instalment Out News In Marathi : महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील पात्र महिलांना महाराष्ट्र सरकार 1500 रुपये सरकार देत आहे आतापर्यंत सरकारने या योजनेअंतर्गत सात हप्त्याचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा केलेले आहेत
परंतु अनेक महिलांना सहावा हप्ता तर मिळाला पण सातवा हप्ता आतापर्यंत त्यांचे बँक त्या जमा झालेला नाही अशातच सरकारकडून उर्वरित महिलांच्या खात्यात सरकार कडून सातवा हप्ता जमा करण्यास सुरुवात केलेली आहे ( Ladki Bahin Yojana 7th Instalment Out ) त्याची माहिती आपण सविस्तर पुढे पाहणार आहोत.
Table of Contents
लाडकी बहीण योजना
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून करण्यात आली ह्या योजनेची अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने 1 जुलै 2024 ते 15 ऑक्टोबर 2024 या कालावधीमध्ये सुरू ठेवण्यात आलेली होती त्यामध्ये 3 करोडच्या जवळपास सरकारकडे ऑफलाइन आणि ऑनलाईन अर्ज सरकार कडे प्राप्त झाले त्यामधील सरकारने दोन करोड 47 लाख महिलांना आतापर्यंत लाभ दिलेला आहे.
Ladki Bahin Yojana 7th Installment Out
महाराष्ट्र सरकारने राज्यातील गरीब कुटुंबातील महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपये महिना दिला जात आहे या योजनेच्या माध्यमातून सरकारने डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पात्र महिलांच्या खात्यात सहावा हप्ता जमा केला व त्यानंतर 24 जानेवारी 2025 पासून या योजनेचा सातवा हप्ता महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला .
हे पण वाचा : लाखो महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा झाले नाही , मुख्य 2 कारणे आले समोर
पुन्हा जमा झाले आज 1500 रुपये
महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता 24 जनवरी 2025 पासून पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात केली होती त्यामध्ये एक करोड पेक्षा अधिक महिलांच्या खात्यात सातवा हप्ता जमा झाला आहे परंतु अशा अनेक महिला होत्या ज्यांना या योजनेचा सातवा हप्ता 30 जानेवारी 2025 पर्यंत मिळालं नव्हता अशा महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र सरकारने उर्वरित महिलांच्या खात्यात सातवा हप्ता जमा करण्यास सुरुवात केलेली आहे त्यामध्ये लाखो महिलांच्या खात्यात आज सातवा हप्ता जमा झालेला आहे.
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .