Ladki Bahin Yojana 8th Installment : लाडकी बहीण योजनेचा 8 वा हप्ता कधी मिळणार ? या वेळी खात्यात ₹2,100 जमा होतील का ?

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ladki Bahin Yojana 8th Installment News In Marathi : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना सरकारकडून 1500 रुपये महिना दिला जात आहे सरकारने 24 जानेवारी 2025 ते 31 जानेवारी 2025 पर्यंत या योजनेचा सातवा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा केला आहे आतापर्यंत सरकारने या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँका खात्यात जुलैपासून ते जानेवारीपर्यंतच्या सात हप्त्याचे एकूण दहा हजार पाचशे रुपये जमा केले आहेत

आता महिला या योजनेच्या आठव्या हप्त्याची ( Ladki Bahin Yojana 8th Installment ) वाट पाहत आहे तर सरकारकडून या योजनेचा आठवा हप्ता कधी जमा केला जाणार व आठव्या हप्त्यांमध्ये 2100 रुपये मिळणार का या संदर्भात सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत.

₹2100 चा हप्ता कधीपासून मिळेल?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी महायुती सरकारने आश्वासन दिले होते की राज्यांमध्ये पुन्हा एकदा महायुती सरकार स्थापन झाल्यास लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपये वरून 2100 रुपये महिना दिला जाईल आणि महिलांच्या आशीर्वादाने राज्यांमध्ये महायुती सरकार पुन्हा स्थापन झाले परंतु महिलांना जानेवारीच्या हप्त्यामध्ये पंधराशे रुपये देण्यात आले त्यामुळे महिलांकडून प्रश्न उपस्थित केला जात आहे की या योजनेअंतर्गत 2100 रुपये महिना कधी दिला जाणार.

या संदर्भात माहिती मिळाली असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी दरम्यान सांगितले होते की यावर निर्णय नवीन अर्थसंकल्पाच्या अधिवेशनात घेतला जाईल त्यामुळे नवीन आर्थिक वर्षात या योजनेअंतर्गत 2100 रुपये महिना महिलांना मिळण्याची शक्यता आहे.

योजनेची रक्कम परत घेतली जाणार

लाडकी बहीण योजनेसंदर्भात माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात बातम्या आल्या की सरकार महिलांकडून लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिलेला लाभ परत घेण्यात येणार यासंदर्भात माहिती मिळाली असता महिला व बालविकास विभागाने स्पष्ट केले आहे की या बातम्या पूर्णपणे खोटे आहे व त्याचप्रमाणे विभागाचे सचिव अनुप कुमार यादव यांनी सांगितले की सरकार कोणत्याही लाभार्थ्याकडून रक्कम परत घेणार नाही आणि ही योजना पूर्वीप्रमाणे सुरू राहील.

महिलांना चिंता करण्याची आवश्यकता नाही

लाडकी बहीण योजनेचा फरवरी महिन्याचा आठवा हप्ता महाराष्ट्र सरकारकडून 15 फेब्रुवारी नंतर पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्याचप्रमाणे या योजनेअंतर्गत 2100 रुपये देण्याचा निर्णय सरकार पुढील अर्थसंकल्पात घेणार आहे त्यामुळे महिलांनी कोणत्याही अफवांवर विश्वास करू नये व योजना कायम सुरू राहणार.

हे पण वाचा :  या महिला झाल्या अपात्र घोषित, सरकारने जाहीर केली अपात्र यादी

Ladki Bahin Yojana 8th Installment

Ladki Bahin Yojana 8th Installment
Ladki Bahin Yojana 8th Installment

महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता दोन कोटी पेक्षा अधिक पात्र महिलांच्या खात्यात 24 जानेवारी 2025 ते 31 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये जमा केलेला आहे आता महिला या योजनेच्या फरवरी महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहे अशातच महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र सरकारकडून 15 फरवरी 2025 ते 20 फरवरी 2025 या कालावधीमध्ये या योजनेचा आठवा हप्ता ( Ladki Bahin Yojana 8th Installment ) जमा केला जाणार आहे.

1 thought on “Ladki Bahin Yojana 8th Installment : लाडकी बहीण योजनेचा 8 वा हप्ता कधी मिळणार ? या वेळी खात्यात ₹2,100 जमा होतील का ?”

Leave a Comment