Ladki Bahin Yojana Complaint Link : महाराष्ट्र सरकारने मागील झालेल्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना प्रति महिना 1500 हजार रुपये दिले जात आहे या योजनेचा लाभ घेऊन महिला आपल्या परिवाराचा सांभाळ करू शकतील व त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागणार नाही या उद्देशाने ही योजना सरकारने सुरू केली आहे.
या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 1 कोटी पेक्षा अधिक महिलांना लाभ देण्यात आलेला आहे परंतु अनेक महिलांचे अर्ज मंजूर असून सुद्धा त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही या सर्व महिलांना सरकारने काही निर्देश जारी केलेले आहेत त्या संदर्भात संपूर्ण माहिती आपण पुढे पाहणार आहोत.
अनेक महिलांना मिळाले 4500 हजार रुपये
महाराष्ट्र सरकारने 25 सप्टेंबर 2024 पासून ते 30 सप्टेंबर 2024 च्या कालावधीत मुख्यमंत्री माजी लाडकी यांचा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात जमा केला आहे ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून तीन हजार रुपये प्राप्त झाले होते अशा महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये जमा झालेले आहेत आणि ज्या महिलांचेअर्ज मंजूर असून त्यांना लाभ मिळेल अशा महिलांना तीन महिन्याची मिळून साडेचार हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा झालेले आहेत.
खाते आधार लिंक नसल्यामुळे लाखो महिला योजनेपासून वंचित
अनेक महिलांचे अर्ज मंजू असून सुद्धा त्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार अनेक महिलांच्या आधार कार्ड बँक खाते लिंक नसल्यामुळे त्यांच्या खात्यात या योजनेचा लाभ जमा झाले नाही त्यामुळे महिलांनी लवकरात लवकर आपले बँक खाते आधार लिंक करून घ्यावी त्यानंतर महिलांच्या खात्यात या योजनेचा पैसा जमा होईल.
तिसरा हप्ता जमा झाला नाही, इथे करा तक्रार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज मंजूर असून सुद्धा तुम्हाला या योजनेचा लाभ मिळाला नाही तर तुम्हाला काळजी करण्याची आवश्यकता नाही तुम्ही 181 या अधिकृत टोल फ्री हेल्पलाइन क्रमांक वर पैसे जमा झाले नाही अशा संदर्भात तक्रार नोंदवू शकता अन्यथा तुम्ही जवळच्या अंगणवाडी केंद्र किंवा तालुकास्तरीय महिला व बाल कल्याण विभाग येथे भेट देऊन तक्रार नोंदवू शकता.
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .
Mala paisa ale nahi