ladki bahin yojana december News In Marathi : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेला महाराष्ट्र मध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे महाराष्ट्र सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या योजनेला लागू करून महिलांना लाभ दिला या योजनेचा लाभ घेऊन महिला सक्षम होतील व त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू नये या उद्देशाने सरकारने योजना लागू केली
आतापर्यंत सरकारने जुलै ते नोव्हेंबर पर्यंतचे सर्व हप्ते महिलांच्या खात्यात जमा केलेले आहेत परंतु सरकारने आश्वासन दिल्याप्रमाणे महायुती सरकार राज्यात पुन्हा स्थापन झाल्यास योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रकमेद वाढ करून 2100 रुपये महिना देणार आणि लाडक्या बहिणीच्या आशीर्वादाने राज्यात महायुती सरकार पुन्हा स्थापन झाले.
त्यामुळे राज्यातील महिला आता या योजनेच्या डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे अशातच महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे सरकारकडून डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा करण्या संदर्भात महत्त्वाची माहिती दिलेली आहे ते आपण सविस्तर पुढे पाहणार आहोत.
महिलांना 2100 रुपये या दिवशी जमा होणार
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील अधिवेशनामध्ये बोलताना त्यांनी लाडकी बहीण योजने संदर्भात महत्त्वाची माहिती दिली विरोधकाकडून विचारण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेच्या प्रश्नासंदर्भात उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले अधिवेशन समाप्त झाल्यानंतर लाडक्या बहिणीच्या खात्यात आमचे सरकार डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा करणार आहे .
परंतु सरकारकडून अद्याप या योजनेच्या वाढीव हप्त्या देण्यासंदर्भात कुठलाच निर्णय घेण्यात आलेला नाही त्यामुळे या योजनेअंतर्गत महिलांना फक्त पंधराशे रुपये महिना देण्यात येणार आहे अशी माहिती समोर येत आहे तसेच मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2100 रुपये देण्याचा निर्णय सरकार मार्च महिन्यामध्ये घेणार आहे अशी माहिती समोर येत आहे.
हे पण वाचा : अरे बापरे लाखो महिला अपात्र, लगेच चेक करा तुमचे नाव आहे का ?
डिसेंबर महिन्याचे पैसे पुढील 48 तासात जमा होणार
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात लाडकी बहीण योजने संदर्भात बोलताना ते म्हणाले की आम्ही या योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता अधिवेशन झाल्यानंतर महिलांच्या खात्यात जमा करू त्याचप्रमाणे शनिवारी राज्याचे अधिवेशन समाप्त झालेली आहे त्यामुळे महिलांच्या खात्यात पुढील 48 तासाच्या आत डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा करण्यात येणार अशी माहिती समोर येत आहे.
त्याचप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमांमध्ये लाडकी बहीण योजने संदर्भात बोलताना ते म्हणाले लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता याच महिन्यात महिलांच्या खात्यात जमा केला जाणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले.
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .